Purna Police;ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीमेत ९ वाहनचालकांवर कारवाई
पूर्णा/प्रतिनिधी
(Purna/Parbhani):-दारूचे सेवन(Alcohol consumption) करून वाहन चालवित नव वर्षाचे स्वागत करू पाहणाऱ्या वाहनचालकांवर ३० व ३१ डिसेंबर रोजी रात्री पूर्णा पोलिसांनी केलेल्या’ ड्रंक अँड ड्राईव्हच्या” (Drunk and Drive) कार्यवाहीत ९ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी खटले भरले असल्याची माहिती समोर आली आहे.
नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी पुर्वसंध्येला उस्ताहीपणात काही जणं जंगीपार्टीचे आयोजन करतात. दरम्यान दारूच्या नशेत उस्ताहीपणात अनेकदा वाहन अपघात देखील होतात.उस्ताहाच्या वातावरणात अपघात रोखण्याकरीता पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी (Suprtendand of Police RavindraSing Pardesi)यांनी (New Year)नवीन वर्षाचे स्वागत करतांना दारूच्या नशेत वाहन चालविल्यामुळे घडणाऱ्या अपघातांवर अंकुश लावण्यासाठी नववर्षाचा आनंद अपघात मुक्त होण्यासाठी दि.२९ ते ३१ डिसेंबर दरम्यान जिल्हाभर ‘ड्रंक अँड ड्राईव्हच्या’विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.पूर्णा शहर व परिसरात उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, यांच्या नेतृत्वाखाली सपोनि रामकिशन नांदगावकर, पोउपनि. प्रकाश इंगोले, फौजदार श्रीनिवास पडलवार, फौजदार भोसले, फौजदार पुणेकर ,जमादार अण्णा माने बोईनवाड,रमेश मुजमुले,आमेर चाऊस,भगवान वाघमारे,पोहेकाॅ.बंडु राठोड,पोकाॅ.मंगेश जुकटे,अक्षय वाघ, संदिप चौरे,पवन लांडेवाड ,पोकाॅ.सानप आदींच्या पथकासह विशेष पोलीस दल होमगार्ड यांनी पूर्णा शहर व हद्दीत रविवार दि. २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर रोजी दरम्यान झिरो टी पाईंटवर,ताडकळस टी पाईन्ट, आनंदनगर चौक, राजमुद्रा चौक,रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठेत नाकेबंदी केली होती.नियुक्त पोलीस अधिकारी व अंमलदारांनी जागोजागी वाहनांची तपासणी करत दारूचे सेवन करून नशेत वाहन चालविणाऱ्या एकुण ९ वाहन चालकांविरूध्द ड्रंक अँड ड्राईव्हची कार्यवाही करून वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुध्द मोटार वाहन कायाद्यानुसार कार्यवाही केली असल्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी सांगितले आहे.