होळीच्या दोन दिवसांनी पूर्णा पोलीसांचा रंगोत्सव
वेळात वेळ काढून साजरी केली धुळवड
पुर्णा(प्रतिनिधी)
देशभरात नुकताच होळी धुळवडीचा उत्सव साजरा करण्यात आला. तर अनेकांनी या दिवशी रंग खेळत पार्टी केली असेल. पण ऑन ड्युटीवर असलेल्या पोलिसांना ् मात्र कर्तव्यामुळे होळी साजरी करता आली नाही.खाकीतला माणुस नागरिकांची धुळवड शांततेत साजरी व्हावी यासाठी दिवसभर ड्युटीवर होता.कर्तव्यात कसुर नको म्हणून पूर्णा पोलिस ठाण्यातील पोलीसांनीही शुक्रवारी होळी साजरी नकरता रविवारी १६ रोजी दैनंदिन कर्तव्य पार पाडत लंच टाईम वेळात वेळ काढून काही क्षण रंगबिरंगी करत धुळवड साजरी केली.
पोलीसांना सण उत्सवातील बंदोबस्तामुळे परिवारासोबत आनंदात सहभागी होता येत नाही.परंतु त्यातूनही न खचता प्रेरणात्मक पद्धतीने पोलिस कर्तव्य पार पाडत सण उत्सव आप आपल्या सहकाऱ्यांना घेऊन अगदी परिवारा प्रमाणे साजरा करतात . पूर्णा पोलिस ठाण्याचे हद्दीत पो.नि.विलास गोबाडे यांनी होळीच्या दिवशी सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात केला होता.त्यामुळे होळी ,धुळवड निर्विघ्नपणे पार पडली.गालबोट लागेल अशी कोणतीही अप्रिय घटना हद्दीत घडली नाही.शिवाय ड्रंक अँन्ड ड्राईव्ह मोहीम ही यशस्वी केली.रविवारी
पो.नि.विलास गोबाडे यांनी वेळात वेळ काढून लंच टाईम ब्रेक मध्ये स्वतः ठाण्यातील पोलीस बांधवांना एकत्र करून धुळवडीचा आनंद लुटला.यावेळी एकमेकांवर रंगाची उधळण करत मिठाई भरवून होळी साजरी करत घरुन आणलेल्या डब्यांची पार्टी करत शुभेच्छा दिल्या.पोलीसांच्या आनंदाचे हे काही क्षण प्रस्तुत प्रतिनिधीने आपल्या कॅमेरात टिपले आहेत.