पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक करा पूर्णा अ.भा.मराठी पत्रकार परिषदेची मागणी
पूर्णा/प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील विटा येथील पत्रकारप्रसाद पिसाळ यांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले आहे सांगली जिल्ह्यातील विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर कोणी हल्ला करण्यात आला आहे सत्य वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकार पिसाळ यांच्यावर हा खुनी हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे अशा हल्ल्या करणाऱ्या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे समाज हितासाठी पत्रकारिता करत असताना पत्रकारावर अशा प्रकारचे हल्ले होणे हे घातक आहे पत्रकार पिसाळ यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याच्या पूर्णा तालुका पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती व पूर्णा तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला याप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली त्यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची तालुकाध्यक्ष मुजीब खुरेशी कार्याध्यक्ष गजानन हिवरे तालुका सरचिटणीस अनिस बाबूमिया शहराध्यक्ष मोहन लोखंडे दौलत भोसले मो.आलिम केदार पाथरकर सुशीलकुमार दळवी अमृत कराळे विजय बगाटे श्रीहरी घुले संपत्त तेली शेख असद चांदपाशा सुशील गायकवाड शेख तोफिक सह निवेदनावर आदींच्या स्वाक्षरी आहेत