रेल्वेच्या संयुक्त कर्मी दल विश्रामगृहात पार पडली पत्रकारांची ‘मेडीया टुर’
अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेंद्र कुमार मीना,अभियंता परममित्र, रेल्वेचे विभागीय जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांची पत्रकारांसह प्रमुख उपस्थिती
पूर्णा, ता. २१ (प्रतिनिधी)
दमरेच्या नांदेड विभागातील पूर्णा रेल्वे जंक्शन येथे येथील संयुक्त कर्मी दल विश्रामगृहात रेल्वे कडून चालक व रेल्वे गार्ड यांना दिल्या जाणाऱ्या सोईसुविधांची माहिती सर्व पत्रकारांना व्हावी यासाठी सोमवारी ता.२१ रोजी मीडिया टूर्सचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित पत्रकारांना अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेंद्रकुमार मीना यांनी जातीने फिरुन सर्व माहिती दिली.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागा अंतर्गत मनमाड, छत्रपती संभाजी नगर, पूर्णा, नांदेड, आदिलाबाद, अकोला या ठिकाणी क्रुडेपो आहे त्या ठिकाणाहून रेल्वे सेवेसाठी कर्तव्यावर आलेल्या रेल्वे ड्रायव्हर गार्ड यांना पूर्णा येथे रनिंगरुम वर ड्युटी संपल्यानंतर कशा प्रकारे सुविधा पुरविण्यात येतात यासंदर्भात विभागीय रेल्वेचे अतिरिक्त व्यवस्थापक राजेंद्रकुमार मीना, अभियंता परममित्र, रेल्वेचे विभागीय जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी येथील या ठिकाणास पत्रकारांसमवेत भेट दिली व पाहणी केली. यावेळी त्यांनी मुद्दाम सर्व पत्रकारांना सुविधा पाहण्यासाठी निमंत्रित करत मीडिया टूर्सचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना अतिरिक्त व्यवस्थापक मीना यांनी सांगितले की,हजारो प्रवाशांना सुरक्षित घेऊन जाणाऱ्या ड्रायव्हर व गार्ड यांना थकून ड्युटी वरून आल्यानंतर अगदी घरच्या सारखे पोषक वातावरण मिळावे त्यांना उत्तम आराम मिळावा जेणेकरून पुन्हा कर्तव्यावर जाण्यासाठी ते पूर्णपणे तयार राहू शकतील सुरक्षित प्रवाशांचा हजारो प्रवाशांचा सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी हे ड्रायव्हर व गार्ड फिट असणे शारीरिक व मानसिक दृष्ट्या फिट असणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी रेल्वे प्रशासन त्यांना मनोरंजन कक्ष वाचनालय योगा प्राणायाम कक्ष मसाज सुविधा भोजन व अल्पोपहार कक्ष वातानुकूलित शयन कक्ष खुर्ची टेबल बगीचा स्नानासाठी गरम पाणी स्वच्छतागृह आदीं सुविधा उपलब्ध करून देते. पूर्णा येथे एका वेळी ७२ कर्मचाऱ्यां साठी शयन कक्ष आहेत. स्वतंत्र महिला कर्मचाऱ्यांसाठी कक्ष आहेत. हा सर्व परिसर सीसीटीव्ही च्या निगरणीत असून महिला कर्मचाऱ्यांना रात्री उशिराने ड्युटी वरून आल्यानंतर या कक्षा पर्यंत रेल्वे स्थानकावरून सुरक्षित आणून सोडल्या जाते व ड्युटीवर जाण्यासाठी या ठिकाणाहून नेले जाते. या ठिकाणी रेल्वे प्रशासन थांबणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ सहा रुपयांमध्ये भोजन अल्पोपहार सुविधा पुरवते त्यांचे वरील ५९ रुपये रेल्वे प्रशासन भरत असते या ठिकाणच्या रेल्वे कर्मचाऱ्यांची सुविधा ही त्यांची गाडी चालवण्याची क्षमता उत्तम राहावी त्यांना पूर्ण आराम मिळावा व कर्तव्य बजावण्या साठी ते पूर्णपणे फिट रहावे यासाठी रेल्वे ही सुविधा पुरवते.असे त्यांनी सांगितले. यावेळी विवीध माध्यमांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.