Purna Railway News;चुडावा-मरसुळ बायपास रद्द करा-खा.संजय जाधव यांची रेल्वेमंत्री वैष्णवांकडे मागणी
पूर्णा ता.६(प्रतिनिधी)परभणी लोकसभा मतदारसंघाचे(Parbhani loksabha MP Sanjay Jadhav Shivsena) शिवसेना(उबाठा)खासदार संजय जाधव यांनी चुडावा ते मरसुळ(Purna Railway Bypass)दरम्यान रेल्वे विभागाने प्रस्तावित केलेल्या बायपास प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांसह पुर्णेकरांचा तीव्र विरोध पहाता हा प्रकल्प तत्काळ रद्द करण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.यावेळी हिंगोलीचे खा.नागेश पाटील आष्टीकर (Hingoli MP Nagesh Patil Ashtikar)यांची देखील उपस्थिती होती.

खासदार जाधव यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की,त्यांच्या मतदारसंघातील पूर्णा जंक्शनपरिसरातील बरबडी,गौर आडगांव,आदीं गावांतील शेतकरी “चुडावा ते मरसुळ” या प्रस्तावित बायपास रेल्वे बायपास प्रकल्पाला कडाडून विरोध करत आहेत. या बायपास लाईनसाठी भूसंपादन केल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांकडे अल्पभूधारणा आहे, त्यांची शेती उद्ध्वस्त होणार असून त्यांचा उदरनिर्वाहही धोक्यात येणार आहे.प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीची यादीही खासदार जाधव यांनी पत्रात नमूद केली आहे उत्पादनक्षम शेती नष्ट होणार,शेतकरी कर्जबाजारी होणार,आत्महत्येचे प्रमाण वाढू शकते,पूर्णा जंक्शनचे रेल्वे महत्त्व घटू शकते,स्थानिक व्यापारावर परिणाम होणार.या पार्श्वभूमीवर या भागातील शेतकरी व ग्रामस्थ बायपास प्रकल्पासाठी भूमी देण्यास साफ नकार देत आहेत. सरकारने या भागातील ग्रामस्थांच्या भावना व वास्तव समस्यांचा विचार करून हा प्रकल्प त्वरित रद्द करावा, ऐतिहासिक पुर्णा रेल्वे जंक्शनला जोडून हा बायपास करावा अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी केली आहे.शेतकऱ्यांच्या भावना डावलून जबरदस्तीने भूसंपादनाचा प्रयत्न झाल्यास “शांतता मूलक व तीव्र आंदोलन” छेडण्याचा इशाराही यावेळी खासदार जाधव यांनी दिलेल्या नमूद केले आहे.












