पुर्णेतील रेल्वे उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर
लवकरच सुरू होणार वाहतूक;पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची अपेक्षा.!
पूर्णा/प्रतिनिधी
पूर्णा शहरातून हिंगोली व नांदेड कडे जाणाऱ्या रेल्वे लोहमार्गाच्या गेटवर निर्माणधीन अवस्थेत असलेल्या रेल्वे उड्डाणपूलाचे काम प्रगतीपथावर असून ,ते अंतिम टप्प्यात आले असल्याचे दिसत आहे.येत्या दोन ते तीन महिन्यांत पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्णत्वास जाऊन यावरून वाहतूक सुरू होईल असा अंदाज दिसत आहे.
पूर्णा शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्र २४९ रस्त्यावर रेल्वे गेट क्र१७६अ.किमी ९४८/६.५ व १३४अ.किमी ३२०/६.७ दरम्यान महारेल कार्पोरेशन कडून सुरू आहे.या कामास २०१९ मध्ये प्रारंभ झाला होता.दरम्यान दोन वर्षे कोरोना काळामध्ये काम रखडले होते.उड्डाणपुलासाठी तब्बल २७ पिल्लर उभारण्यात आले आहेत. उड्डाणपुलासाठी १२८ कोटी रुपये खर्च होत आहे .या कामात त्वत्कालीन कंत्राटदाराने हलगर्जीपणा करत कमकुवत,निकृष्ट ९ पिल्लर उभारले होते ते तोडण्यात आले.कंत्राटकंपनी बदलुन दुसरी कंपनीकडे काम देण्यात आले.अश्या तांत्रिक अडचणींमुळे संबंधित कामाचा कालावधी वाढला आहे.सदरील उड्डाणपुलाच तयार होत असलेल्या प्रमुख एकमेव रस्ता असल्याने चार वर्षांपासून पर्यायी भुयारी मार्गाखालून वाहतूक सुरू आहे.पर्यायी रस्ता खराब असल्याने तसेच पावसाळ्यात पाणी साचत असल्याने शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले होते.आता निर्माणधिन उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून, पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या भराव भरणे,तसेच हि़गोली गेट ते नांदेड रेल्वे गेट दरम्यान काॅक्रेट स्लॅब चे तसेच लहान सहान कामे वगळता ९० टक्के काम पूर्ण झाले असून,येत्या दोन ते तीन महिन्यांत अगदीच पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.