रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मचे शेड गळू लागले;प्रवाशांची तारांबळ
पूर्णा स्थानकावरील प्रकार; निकृष्ट कामाचा परिणाम
पूर्णा(प्रतिनिधी)
गुरुवारी सयं आलेल्या अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे पूर्णा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील मुख्य प्रवेशद्वारासमोरील शेडला पाण्याची गळती लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.यामुळे प्रवाशांची मोठी धावपळ उडाली. काही प्रवासी पावसापासून वाचण्यासाठी इतर प्लॅटफॉर्मवर धावले, तर काहींना ओल्या जागेत उभे राहणे पसंत केले.
पूर्णा शहर व परिसरात गुरुवारी ३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले.अर्धाते पाऊण तास पडलेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.शहरातील विविध भागांप्रमाणेच रेल्वे स्टेशनवरही पावसाचा मोठा प्रभाव पडला. पावसामुळे प्लॅटफॉर्म ४ च्या शेट पत्र्यातून ठिकठिकाणी पाणी गळू लागले.मागील वर्षांपासून प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील पत्र्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे.रेल्वेचे स्थानिक अधिकारी थातूरमातूर कामे करून कंत्राट कंपनीच्या कामाला पाठीशी घालत आहेत.परिणामी, आजच्या अवकाळी पावसामुळे छताच्या जोडांमधून आणि काही ठिकाणी तुटलेल्या पत्र्यांतून मोठ्या प्रमाणात पाणी गळू लागले. पावसाचे प्लॅटफॉर्मवर पडत असल्याने प्रवाशांना सामान वाचवण्यासाठी इतरत्र हलावे लागले. काही प्रवासी पावसापासून बचाव करण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या स्तंभांखाली आणि कोपऱ्यांमध्ये उभे राहिले.स्थानिक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. अनेक प्रवाशांनी सांगितले की, “रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाचे काम सुरू असूनही प्लॅटफॉर्मवर अद्याप काही ठिकाणी जुने पत्रेच आहेत.प्लटफार्म क्र.१ ,२,३,४ वर नवीन टिनशेडचे काम अर्धवट रित्रिया केले आहे. जुना दादरा उखडून ठेवला आहे.अनेक महीन्यापासुन काम बंद असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.प्रवाशी त्तक्रारी करूनही प्रश्न सुटत नाही त्यामुळे रेल्वे विभागाच्या वरिष्ठांनी यात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.”. रेल्वे प्रशासनाने ही समस्या गांभीर्याने घेऊन त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.