पूर्णेत श्री रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा
प्रभु रामचंद्राची भव्य मुर्ती,रामलीला, वानरसेनेने लक्ष वेधले
पूर्णा/प्रतिनिधी
श्री रामनवमी निमित्त शहरातील रामभक्तांनी ढोल ताशांच्या गजरात श्रीरामचंद्राच्या सुबक मुर्ती सह राम,सिता, लक्ष्मण,हनुमानाच्या पालीखीच्या भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते.यावेळी “सियांवर रामचंद्र की जय”घ्या जय घोषणेने शहर दनाणुन सोडले बाळ गोपाळ महीलां सह हजारों रामभक्तांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला.
पूर्णा शहरातील आनंद नगरातील दक्षिण मुखी हनुमान मंदिर पासून रविवारी ६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास रथात विराजमान प्रभु रामचंद्रांच्या भव्य मुर्ती तसेच आकर्षक सजावट केलेल्या पालखीत राम,सिता हनुमान यांच्या मुर्तीची मिरवणूकीला ढोल ताशांच्या गजरात सुरुवात झाली.ही मिरवणूक आनंदनगरचौक, मुख्य मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौक, महादेव मंदिर,जुना मोंढा बाजार येथिल श्रीराम मंदिर संस्थान पर्यंत काढण्यात आली.यावेळी बालकलाकारांनी , प्रभु रामचंद्रांच्या काळातील वेशभुषा करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.श्रीराम मंदिर संस्थान येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची राधेश्यामजी दायमा व पंडित मयूर महाराज दायमा यांच्या हस्ते महापूजा करत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर आरती, पाळणा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळ पासुनच राम मंदिरात टाळ मृदंगाच्या गजरात भजन गायल्या जात होते. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली.यावेळी शहर व परिसरात उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील यांच्या मार्गदर्शना पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.