सावधान;पूर्णा नदीपात्रात मंगळवारी २ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग
प्रशासनाचे सतर्कतेचा ईशारा;नदीपात्रात कोणीही उतरूनये
पूर्णा(प्रतिनिधी)
सिद्धेश्वर जलाशयातून पूर्णा शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी नदीपात्रातील बंधा-यात मंगळवारी ता.४ मार्च रोजी दुपारी ४ वाजता २ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सं.बा.बिराजदार यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
नगर परिषद, पूर्णा यांचे मार्फत पुर्णा नदीवर असणारा पूर्णा कोल्हापुरी बंधा-यामध्ये पाणी नसल्यामुळे पाणी सोडुन पूर्णा शहरासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.त्यानुषंगाने पूर्णा शहरास पिण्याच्या पाण्याची आवश्यकता पहाता सिध्देश्वर धरणाच्या वक्र व्दाराव्दारे उद्या मंगळवारी ४ रोजी दुपारी ४ वाजता साधारणतः २ क्युसेक्स वेगाने सिद्धेश्वर जलाशयाच्या वक्र दरवाज्यातुन पूर्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.त्यामुळे पूर्णा नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होणार आहे.नदी काठच्या परिसरातील गावाच्या लोकांनी दरम्यान नदी पात्रात कोणीही उतरु नये, वाहने, जनावरे सोडू नये असा सावधानतेचा ईशारा पालीकेचे पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार,मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांनी दिला आहे.