पूर्णा तालुक्यात फिरती ‘कँन्सर व्हॅन’ दाखल
पूर्णा(प्रतिनिधी)
गावांगावांत जावून मुख कर्करोग, महिलांमधील स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोगाचे निदान करण्यासाठी जिल्ह्यात फिरती कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन दाखल झाली आहे. आसुन पुढील महिनाभर ही व्हॅन जिल्हाभर फिरणार असून गावांतील आरोग्य कर्मचारी, यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
पूर्णा ग्रामिण रूग्णालय येथे गुरुवारी २४ एप्रिल रोजी ‘कर्करोग मोबाईल व्हॅन’ दाखल झाली शहर व तालुक्यातील यावेळी १६० रूग्णानची कर्करोग तपासणी करण्यात आली आसुन दरम्यान, महिलांमध्ये उद्रेक होत असलेल्या कर्करोगाचे निदान यामुळे शक्य होणार असल्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक बदल घडणार आहेत. कर्करोगाचे वाढते प्रमाण नियंत्रणात आणणे, कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे, नवीन कर्करोग रुग्णांचे प्रमाण कमी करणे यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. दरम्यान, आता गावपातळीवर जनजागृती करून कर्करोगाची संभाव्य लक्षणे आढळणाऱ्या पुरूषांसह, महिलांमधील स्तन-गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची लक्षणे आढळणाऱ्यांना तपासणीसाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. ही व्हॅन या व्हॅनमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातील कार्यरत एका स्त्रीरोग तज्ज्ञ, एक दंतरोग तज्ज्ञ हे सेवा देणार आहेत. पूर्णपणे वातानुकूलित असलेल्या या व्हॅनमध्ये कर्करोग निदान संदर्भात तपासण्यांसाठी अद्ययावत वैद्यकीय साधनसामग्री दाखल आहे. यामध्ये तालुक्यातील विविध गावांमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. शासनाने उपलब्ध केलेल्या या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी डॉ. सादिया चिश्ती, डॉ.सुप्रिया राजगुरू, डॉ.संदिप भास्के, अब्दुल शहीद फारुकी,सिंन्ड्रेला झांबरे,कृष्णा चापके,ब्रम्हगिरी गुट्टे,उषा पाटील रूमान शेख,सय्यद फयुम,सय्यद सलिम आदींनी येणाऱ्या रूग्णांच्या तपासण्या केल्या.