पूर्णेत तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धांचे वेळापत्रक ठरले;क्रिडा समीतीची बैठक संपन्न.

Spread the love

पूर्णा ता.२५(प्रतिनिधी)

येथिल गटसाधन केंद्रात शुक्रवारी (ता.२५) रोजी तालुका क्रिडा समीतीची बैठक पार पडली असून १४ ते १९ वयोगटातील तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धांचे वेळापत्रक ठरवण्यात आले आहे . येत्या १८ ऑगस्ट ते २६ ऑक्टोंबर या कालावधीत या स्पर्धा पूर्णेतील क्रीडा संकुल येथे पार पडणार असल्याची माहिती तालुका क्रीडा अधिकारी कल्याण पोले यांनी दिली आहे.

        पूर्णेत २०२५-२६ या वर्षातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी येथिल गटसाधन केंद्रात शुक्रवारी गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुका क्रिडा अधिकारी कल्याण पोले यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची बैठक एक महत्वपूर्ण बैठक पार पडली.यावेळी १८ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर या कालावधीत खो-खो, कुस्ती, व्हाॅलीबाॅल, क्रिकेट, कब्बडी, मैदानी खेळ,योगा,बुद्धीबळ, बॅडमिंटन आदीं खेळांचे वेळापत्रक ठरवण्यात आले. क्रिडा शिक्षकांनी करावयाची तयारी तसेच ऑनलाइन प्रवेशिका वेळेवर भरण्याचे आणि स्पर्धेत सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आले.यावेळी गट शिक्षणाधिकारी कापसीकर यांनी मार्गदर्शन केले.तर पोले यांनी क्रीडा शिक्षकांकडून अडचणी समजावून घेतल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक धरम सिंह बायस तर सूत्रसंचालन अनिल ढाले यांनी केले.प्रसंगी क्रीडा संघटनेचे प्रकाश रौंदळे, सुनील सूर्यवंशी, शारीरिक शिक्षक संघटनेचे शंकर घाटोळ, वामन पाटील, मुख्याध्यापक मैत्रे सर यांच्या सह तालुक्यातील क्रीडा शिक्षक क्रीडाशिक्षीका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       क्रिडा संकुलात वृक्षारोपण.                                    पूर्णा तालुका क्रीडा संकुल परिसरात  क्रीडा अधिकारी कल्याण पोले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी मुख्याध्यापक देविदास उमाटे व मुख्याध्यापिका श्रीमती आतिया मॅडम,क्रिडा शिक्षक प्रकाश रौंदळे व क्रिडा संयोजक धरम सिंह बायस यांच्यासह शाळेतील विद्यार्थी कर्मचारी हे उपस्थित होते.

You cannot copy content of this page