पुर्णेकर नगराध्यक्षपदी पुन्हा शिवसेनेलाच संधी देतील-जिल्हाप्रमुख आणेराव

Spread the love

निवडणूकीच्या अनुषंगाने ईच्छुक पदाधिकारी,उमेदवारांची बैठक

पुर्णा,ता.६(प्रतिनिधी)येथिल जनतेने मागील निवडणुकीत विश्वास दाखवत शिवसेनेचा नगराध्यक्ष खुर्चीवर बसवला.शिवसेनेच्या सत्तेच्या काळात शहरात महापुरुपांचे पुतळे, सुशोभीकरण, पालीका कार्यालय व व्यापारी संकुल,रस्ते, पाणीपुरवठा,लाईट आदीं दिमाखदार विकास कामे नगराध्यक्ष‌ व नगरसेवकांनी करवून दाखवत जनतेचा विश्वास सार्थ ठरवला आहे.त्यामुळे पुर्णेची जनता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला पुन्हा एकदा सेवेची संधी निश्चितच देतील असा ठाम विश्वास शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांनी व्यक्त केला आहे.

पुर्णा शहरात पालीका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना (उबाठा) पक्षाच्या आजी माजी पदाधिकारी,लोकप्रतिनिधीं ईच्छुक उमेदवार,कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.यावेळी माजी जिल्हा प्रमुख सुधाकर खराटे, उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले, तालुका प्रमुख काशिनाथ काळबांडे,शहरप्रमुख मुंजा भाऊ कदम,मा.नगराध्यक्ष संतोष एकलारे‌ व साहेब कदम, युवासेना ता.प्र.बंडुअप्पा बनसोडे आदीं मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव म्हणाले की,पुर्णा शहराने मागील लोकसभा,विधानसभा,पालीका निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, परभणीचे खासदार, उपनेते संजय उर्फ बंडु जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला भरभरून मतदान दिले आहे.हे एक विश्वासाचे प्रतिक आहे.जनतेच्या सेवेसाठी मागील काळाप्रमाणे पुढेही शिवसेना कटीबद्ध राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.युतीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की,महाविकास आघाडीतील घटकपक्षांना सोबत घेऊन या निवडणुकीला सामोरे जाणार आहे.तशी चर्चा देखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.बहतांश प्रभागात उमेदवार उभे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी पालीका निवडणुकीस ईच्छुक उमेदवारांशी आणेराव यांनी चर्चा केली. त्यात अनेक उमेदवारांनी निवडणूक लढविणार असल्याची ईच्छा व्यक्त केली.त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी सौ. लता सुधाकर खराटे, सौ. प्रेमला संतोष एकलारे आणि सौ. अनिता सुनिल जाधव या उमेदवारांची नावे समोर आली आहेत.

प्रभाग क्र. 1 (मस्तानपुरा) OBC महिला : शमीम बेगम चांदसाब बागवान ओपन पुरुष : केशव सिताराम कदम, शेख जावेद शेख मन्नान

प्रभाग क्र. 2 (आनंद नगर) OBC महिला : गायत्री गजानन हिवरे, मुक्ताबाई गुंजकर, दिव्या प्रमोद एकलारे, उषा लक्ष्मण माने ओपन पुरुष : शंकर दिनकर गलांडे, प्रा. गोविंद साहेबराव कदम

प्रभाग क्र. 3 (क्रांती नगर) SC महिला : कल्पना योगेश भद्रे, लीलावती गणपतराव पंडित ओपन पुरुष : जीवन विनायकराव बरीदे, रौफ कुरेशी सर

प्रभाग क्र. 6 (शास्त्रीनगर) SC महिला : शांताबाई सूर्यभान उबाळे ओपन पुरुष : सय्यद अमजदानी सय्यद मूर्तजानी, अमजद खान नय्युम खान पठाण

प्रभाग क्र. 7 (महावीर नगर) OBC महिला : विजया शरद कापसे, दिव्या प्रमोद एकलारे,शिवनंदा बापुराव पळसकर ओपन पुरुष : डॉ. मानसी नरेंद्र राठोड, सुनिल दत्तराव कदम, श्याम सोनाजी कदम, मुंजा शंकरराव कदम

प्रभाग क्र. 8 (कोळीवाडा) ST महिला : सुरेखा राजू सोळंके, रोहिणी शिवराम भंगे OBC पुरुष : रेखा मंचक कदम

प्रभाग क्र. 9 (भीमनगर) ओपन पुरुष : श्रीनिवास बाबूआप्पा तेजबंद, सुमित नंदलाल चावरे

प्रभाग क्र. 10 (हरी नगर) OBC पुरुष : सुनिल लक्ष्मणराव जाधव SC महिला : गौतम सिताराम भोळे आदींनी‌ ईच्छुक असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page