जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल गंगाप्रसाद आणेराव यांचा सत्कार
परभणी ता.६(प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या परभणी जिल्हा प्रमुखपदी नुकतीच निवड झालेल्या जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांचा पुर्णा तालुक्यातील शिवसेना उपतालुकाप्रमुख रमेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यालयात सत्कार केला.
यावेळी पुर्णा उपतालुकाप्रमुख रमेश ठाकूर, बालाजी वैद्य, शिवा पाथरकर, चंद्रकांत लोखंडे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.त्यांनी जिल्हाप्रमुख आणेराव यांचा पुष्पहार व शाल, श्रीफळ देऊन गौरव केला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुखांच्या कार्याचे कौतुक करत नवी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी शिवसेना (उबाठा) च्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. नव्या जिल्हाप्रमुखांच्या निवडीमुळे परभणी जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून पक्ष संघटन अधिक जोमाने कार्यरत होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.












