पुर्णेत आर्थिक साक्षरतेवर ऑनलाइन सेमिनार; श्री.गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयाचा उपक्रम

Spread the love

विद्यार्थ्यांना “आपल्या पैशाचे व्यवस्थापन” करण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

पूर्णा (दि. २५ सप्टेंबर) येथिल श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयातील वाणिज्य विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि दिल्ली येथील एस. व्ही. वेल्थ पार्टनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने “Help Peoples Manage Their Own Money” या विषयावर एकदिवसीय ऑनलाइन सेमिनारचे आयोजन झूम अॅपद्वारे करण्यात आले.

या सेमिनारमध्ये बी.कॉम. प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील शिक्षकवर्ग सहभागी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. के. राजकुमार होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. शिवसांब कापसे, डॉ. संजय दळवी डॉ. दिशा मोरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिशा मोरे यांनी केले तर प्राचार्य डॉ. राजकुमार यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.मुख्य वक्ते म्हणून एस. व्ही. वेल्थ पार्टनर्स, दिल्लीचे श्री. सुरेंद्र कुमार यांनी “आर्थिक साक्षरता” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी उत्पन्नाचे सहा स्तंभ, ॲक्टिव्ह इन्कम व पॅसिव्ह इन्कम, गुंतवणूक, कंपाऊंड व्हॅल्यू, म्युच्युअल फंड व एसआयपी अशा महत्त्वाच्या संकल्पना समजावून सांगितल्या.

या सेमिनारला एकूण १०९ जणांचा सहभाग नोंदविण्यात आला, ज्यामध्ये वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आणि प्राध्यापकवर्ग यांचा समावेश होता.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाणिज्य विभागातील प्राध्यापक डॉ. स्मिता जामधाडे, श्री. वैजनाथ ईडोळे, श्री. कृष्णा बेटकर,डॉ. रवींद्र राख, डॉ. बाळासाहेब मुसळे, डॉ. सोमनाथ गुंजकर तसेच कर्मचारी भगुसिंह बायस, कालिदास वैद्य, गजानन भालेराव यांनी परिश्रम घेतले.


You cannot copy content of this page