मशनरी दुकानाला आग ४० लाख रुपयांचे साहित्य जळाल्याचा अंदाज

Spread the love

ताडकळस येथिल घटना;अग्निशमन दलासह ,पोलिसांसह ग्रामस्थांचे आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न

ताडकळस(प्रतिनिधी):

तालुक्यातील ताडकळस येथिल बार पेठेतील एका मशनरी दुकानिला लागलेला आगीत सुमारे ४० ते ५० लाखांचे साहित्य जळून नष्ट झाल्याची घटना घडली असून,वेळीच अग्निशमन दलासह ,पोलिसांसह ग्रामस्थांचे आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न झाल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे.

पूर्णा तालुक्यातील मौजे ताडकळस येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या राधा मशिनरी अँड जनरल स्टोअर्स या दुकानाला रविवार ९ मार्च रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीमुळे या दुकानातील बांधकाम साहित्य, शेतीचे आवजारे जळुन खाक झाले असून या आगीत जवळपास ४० ते ४५ लाखाचे नुकसान झाले आहे.आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस, पूर्णा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानासह ग्रामस्थांनी तब्बल तीन ते चार तासांच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

फुलकळस येथील शिवलिंग रोहीदास कुबडे यांचे राधा मिशनरी अँड जनरल स्टोअर्स ट्रेश या नावाने दुकान आहे. या दुकानात शेतातील व घरगुती विद्युत मोटार, विविध प्रकारचे वायर , टायर्स, छोटे -मोठे नट बोल्ट,१००,२००, ,३००, ५००, १००० लिटर पाण्याची क्षमता असलेल्या टाक्या,पियुसी पाईप,नळ फिंटीगचे सर्व साहित्य, स्टील पत्रे, लोखंडी साहित्य असे विविध साहित्य विक्री केली जाते. रविवार ९ मार्च रोजी नेहमीप्रमाणे रात्री ९ वाजेच्या सुमारास दिवसभर व्यवहार करुन दुकान बंद केले होते. अचानक रात्री ९ ते १० दरम्यान राधा मशिनरी अँड जनरल स्टोअर्स या दुकानाला आग लागली. या घटनेची माहिती बाजारपेठेतील परिसरातील नागरिकांनी कळताच त्यांनी तात्काळ दुकान मालकाला दिली . पोलिस ठाण्याच्या जवळच घटना झाल्याने तात्काळ सपोनि गजानन मोरे, पोलिस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे यांच्यासह पोलिस कर्मचारी, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने आजुबाजूच्या दुकानांना आग लागण्याची शक्यता असल्याने तात्काळ पूर्णा नगर परिषदेची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलातील गणेश रापतवार, अजमत कुरेशी, सोनाजी खिल्लारे,दिपक गवळी यांनी तब्बल एक ते दीड तासांनी आग आटोक्यात आणली. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळुन खाक होऊन अंदाजे ४० ते ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत जीवीत हानी झाले नाही. दरम्यान सदरील घटना विजेच्या शाँर्ट सर्कीटने घडली असल्याचे दुकान मालक शिवलिंग रोहीदास कुबडे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page