पूर्णा-ताडकळस राज्यमहामार्ग रस्त्यावर चारचाकी कार उलटली
कानडखेड शिवारातील घटना;वाहनांचं मोठं नुकसान
पूर्णा(प्रतिनिधी)
तालुक्यातील कानडखेड शिवारातुन जाणाऱ्या पूर्णा-ताडकळस राज्य महामार्ग क्र.६१ रस्त्यावर बुधवारी ता.५ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास एक चारचाकी कार अपघात ग्रस्त होऊन उलटली आहे.अपघातात वाहनांचे मोठं नुकसान झालं असुन सदरील वाहन नेमके कोणाचे आहे.सदरील अपघात नेमका कशामुळे घडला यांची नक्की माहीती समजु शकली नाही.
राज्य महामार्ग रस्ता क्र.६१ हा मृत्यूचा सापळा बनला आहे.मागील काही दिवसांपासून या रस्त्यावर अपघाताची मालीका सुरुच आहे.अपघातात अनेक वाहने क्षतीग्रस्त झालेले आहेत.तर अनेकांनी आपला जीव गमवला आहे.बुधवार ता.५ रोजी पहाटे ४ ते वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कार क्र.एम.एच.१२/एच.एन/००५९ ही बहुधा ताडकळस कडून नांदेडच्या दिशेने जात असताना कानडखेड शिवारातील विट भट्टी जवळ सदरील कार उलटली.ही कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.मात्र अपघात झालेले वाहन नेमके कोणाचे आहे.यातुन किती जण प्रवास करत होते, त्यांना काही ईजा झाली का.? हे मात्र समजू शकली नाही.पूर्णा पोलिस ठाण्यात सदरील अपघाताबद्दल माहिती घेतली असता पोलिसांनी अपघात झाल्याची केवळ पुष्टीच केली आहे.पोलीसांकडून अधिकमाहिती मात्र मिळू शकेल घटनेत नाही.सदरील क्षतीग्रस्त वाहनांचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाल्याचे दिसून आले.












