भरधाव स्काॅरपीओने तरुणांसह पशुधनाला चिरडले.
ताडकळस गावाजवळील घटना;गायीसह शेळीही ठार!
पुर्णा ता.२६(प्रतिनीधी) Purna Accident: तालुक्यातील ताडकळस गावातुन जाणा-या पूर्णा-ताडकळस रस्त्यावर एका भरधाव स्काॅरपीओ (Scorpio) गाडीच्या धडकेत, शेतात जनावरे घेऊन जाणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाचा व त्यांचे सोबत असलेल्या गायीसह शेळीचाही मुत्यु झाल्याची तर दोन शेळ्या जखमी झाल्याची घटना सोमवार (ता.२५) आँगस्ट रोजी घडली.याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात मयताचे नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मच्छिंद्र बिराजी हजारे वय २५ वर्षे रा.ताडकळस असं त्या मयत तरुणाचे नाव आहे.मयत तरुणहा सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ताडकळस-पूर्णा रस्त्यावरील मातोश्री हाँटेलजवळून स्वतः च्या शेतात गाय,तीन शेळ्या घेऊन जात होता.याच रस्त्यावरून पूर्णेकडुन ताडकळसला येणाऱ्या (एम.एच.२६ बी.क्यू .४०९७) या स्कारपीओने जोराची धडक दिली. या धडकेत गाय व शेळी जागेवरच ठार झाली. तर घटनेत मच्छिंद्र हजारे व दोन शेळ्या गंभीर जखमी झाले होते. जखमी झालेल्या मंच्छीद्रला ग्रामस्थांनी परभणी येथे उपचारासाठी दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान या तरुणाचा रात्री ११ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.या प्रकरणी मयताचे नातेवाईक नथुराम हजारे यांनी ताडकळस पोलिस ठाण्यात (Tadkalas Police Station) खबर दिली आहे.यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ताडकळस पोलिस करत आहेत.











