पूर्णेत नारीशक्तींचा सन्मान;तहसिलचा कारभार महीला कर्मचाऱ्यांचा  हाती

Spread the love

तहसील कार्यालयात महीला दिन विविध उपक्रमांनी साजरा

पुर्णा(प्रतिनिधी)

  येथिल महसूल विभागाच्या वतीने महीला दिनाचे औचित्य साधून कार्यालयात काम करणाऱ्या तसेच महसूल क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणा-या नारीशक्तींच्या हाती एकदिवस तहसील कार्यालयाच्या कार्यभार सोपावून सन्मान करण्यात आला..तसेच यावेळी अनाथ २० मुलींना क्षैक्षणीक साहित्य वाटप, ऑग्रीस्टाॅक चा स्टाॅल लावून आयडी कार्ड चे वाटप. संगायो अर्थसहाय्य अनुदान १६ महिलांना वाटप. विविध प्रमाणपत्राचे महिला लाभार्थीना वाटप,राज्यस्तर महिला खेळाडूंचा यथोचित सन्मान आदीं उपक्रम राबविण्यात आले.

     जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार माधवराव बोथीकर,ना.त.प्रशांत धारकर यांनी  पुढाकार घेऊन सोमवार ता.१० रोजी  तहसिल कार्यालयात जागतिक महिला दिना निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या सह महापुरुषांच्या प्रतिमस पुष्प अर्पण करून तहसिल कार्यालयाचा कारभार महसूल विभाग क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणा-या येथिल अव्वल कारकून उज्वला पुलेवाड यांच्या कडे सोपवण्यात आला होता.

एक दिवस तहसिल कार्यालयातील सर्व प्रशासकीय जवाबदारी श्रीमती. प्रियंका जोंधळे,श्रीमती कल्पना शेलगावकर, श्रीमती सुनिता पेटले,श्रीमती शिल्पा सरपे

श्रीमती राधा चांदणे,श्रीमती कविता मठपती,श्रीमती पल्लवी उबाळे,श्रीमती विशाखा वडमारे,श्रीमती वंदना एंगडेश्रीमती नसिमा महेबूब पठाण,श्रीमती राजश्री देसाई,श्रीमती मेहराज पठाण, मनिषा ताटे,आयेशा शेख,अनुष्का झंपनगिरे,पूजा धरणकर,पूजा शिवसांभ भालेराव,राखी भावे,अर्चना भवरे,कल्याणी नावकीकर, अर्चना सूरवसे,योगिता कच्छवे,आरती कच्छवे,रीजल भगत एकूण २५ जणींवर तहसिलदार,नायब तहसिलदार, पुरवठा विभाग.महसुल विभाग.व प्रशासन विभाग प्रमुख पदावर राहुन एक दिवस काम पाहण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली.

यावेळी बोलताना तहसीलदार बोथीकर म्हणाले की,तहसिल मधील महिला कर्मचारी ह्या नेहमी कार्यतत्पर सेवा करतात त्याचाही सन्मान या निमित्त करण्याचा आम्ही निर्णय घेतला महिला ह्या कुटुंबाच्या सर्व जवाबदारी पार पाडत आसतात व कुटुंब व प्रशासकीय काम करताना कुठल्याही आडचणी न सागंता काम करत आसतात म्हणून महिलाचा सन्मान करणे हे माझे कर्तव्य समजुन आम्ही हा सन्मान करत आसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक ना.त.प्रशांत थारकर, नियोजन के.पी.शिंदे,आभार तलाठी गणेश गोरे, सुत्रसंचलन शिवा देवणे, कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यंकटेश जजरवार,दादाराव देसाई, साईनाथ द्याडे, गंगाधर सातपुते, भुस्से आदींनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page