हृदयद्रावक;लोखंडी सब्बल घालून मुलानेच काढला बापाचा काटा.

Spread the love

पूर्णा तालुक्यातील कलमुल येथील घटना; पित्याचा उपचारादरम्यान मृत्यू; चुडावा पोलिसात गुन्हा दाखल

पूर्णा /प्रतिनिधी
स्वतःच्या जाती मिळकतीतील जमिनीवरील झाडे तोडण्यास विरोध करणाऱ्या एका ६५ वर्षीय पित्याच्याच डोक्यात लोखंडी सबबल घालून गंभीर जखमी केले होते. जखमी झालेल्या त्या  पित्याचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना  पूर्णा तालुक्यातील कलमुला गावात घडल्याचे उघडकीस आले आहे.याप्रकरणी चुडवा पोलीसांत ता.२४ जानेवारी रोजी रात्री क्रूर मुलाच्या विरोधात पित्याला जीवे मारल्या प्रकरणी खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटना घडल्यापासून मुलगा फरार झाला आहे.
    शेख आमीन शेख पीर अहेमद साहब वय ६५ वर्ष रा.नवी आबादी कलमुला ता.जि. परभणी असे त्या मयत पित्याचे नाव आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की ,माघील काही दिवसांपासून शेख सब अमीन साब यांचा मुलगा शेख अकबर शेख आमीन,हा नवी आबादी येथील प्लाॅट माझ्या नावाने करून दे म्हणून नेहमी भांडण करत होता.दरम्यान ता.२२ जानेवारी रोजी तो सदरील प्लाॅट वर लावलेली झाडे तोडत होता.यास त्याचे वडील शेख अमीन साब यांनी त्यास विरोध केला असता.झाडे तोडण्याच्या शुल्लक कारणावरून दोघा बाप लेकात कुरबुर झाली.यातच त्याठिकाणी असलेल्या लोखंडी सब्बलीने शेख अकबर याने शेख अमीन साब यांच्या डोक्यात लोखंडी सब्बलीने एका पाठोपाठ एक घाव घातले.यात शेख अमिन हे गंभीर जखमी झाले.घटना घडली यावेळी त्यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले.त्यावेळी अकबर याने नातेवाईक व फिर्यादी शेख अफसर यांना “तुम हमारे झगडो मे मत गिरो नही तो तुमको भी मारता” असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली.यानंतर नातेवाईकांनी अमिन साब यांना गंभीर जखमी अवस्थेत नांदेड येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.ता.२४ जानेवारी रोजी सकाळी त्यांची उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली.याप्रकरणी मयताचे नातेवाईक शेख अफसर शेख रशीद वय ३५ वर्ष यांचे फिर्यादीवरून नांदेड पोलिसांकडून मिळालेल्या एम.एल.सी आधारावरुन चुडावा पोलीस ठाण्यात शेख अकबर शेख आमीन, रा. नवी आबादी कलमुला. ता. पुर्णा याचे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ.समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नरसिंह पोमनाळकर हे करत आहेत.

You cannot copy content of this page