पूर्णेतील एकता अकॅडमीच्या ५१ खेळाडूंना विशाल कदमांकडून शुज गिफ्ट

Spread the love

स्व.दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानचा सुत्य उपक्रम;खेळाडूही आनंदाने भारावले.

पूर्णा ता.२४(प्रतिनिधी)

येथिल सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्व.दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विशाल कदम यांनी एकता अकॅडमीच्या ५१ होतकरू खेळाडूंचे कौतुक करत शुजचे गिफ्ट दिले आहे.या सरप्राईज मुळे खेळाडू आनंदाने अगदीच भारावून गेले होते.

     पूर्णा येथील दाजीसाहेब कदम प्रतिष्ठान धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमासह, समाजातील उपेक्षीत घटकांना सर्वोपतरी मदत करण्यात अग्रेसर आहे.पूर्णेचा झेंडा देशाच्या कानाकोपऱ्यात रोवणाऱ्या त्यासाठी घाम गाळणा-या एकता अकॅडमीच्या खेळाडूंची कामगिरी पाहता प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी खेळाडूंचे कौतुक करत सरप्राईज देत उच्च दर्जाचे शुज गिफ्ट देऊन सन्मान करते सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

      अमृतनगर परिसरातील क्रीडा संकुललात गुरुवारी ता.२४ रोजी एका छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी विशाल कदम यांच्या सह, डॉ.हरिभाऊ पाटील,आबनराव पारवे,जगदीश जोगदंड, पंपटवार सर,सेनेचे गणेश कदम,लक्ष्मण कदम,परीक्षित सवनेकर,रवि गायकवाड, अमजद नुरी,अशोक वाघमारे,नलबलवार सर,शंकर गलांडे, दत्ता कदम,कैलास मुळे, रवी कदम, दत्ता कदम,माऊली कदम, सुभाष जोगदंड,अंकित कदम,उद्धव बोबडे,राम भालेराव,संतोष बहोत,गंगाधर खाकरे,अक्षय कहाते,शेख फैजान,शेख समंदर,अशोक वाघमारे आदींच्या हस्ते ५१ खेळाडूंना शुजचे गिफ्ट देण्यात आले. यावेळी बोलताना विशाल कदम म्हणाले की,एकता अकॅडमीच्या प्रक्षिक्षक सज्जन जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी अंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.खेळाडुंच्या कोणत्याही अडी अडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर राहिन,यापुढेही खेळाडूंना सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी एकता अकॅडमीचे सचिव, प्रशिक्षक सज्जनलाल जैस्वाल यांनी प्रसंगी सुत्रसंचलन व आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page