पुर्णेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक
पुर्णा ता.१९(प्रतिनिधी)Lokshahir Annabhau Sathe Jayanti;आपल्या धारदार लेखणीतून असंख्य कथा, कादंबऱ्या, पोवाडे लिहणारे साहित्यसम्राट, लोकशाहीरडॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त पुर्णा शहरात बुधवारी ता.२० रोजी तैलचित्राची भव्य मिरवणूक तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष राज नारारयणकर संयोजक विनोद गायकवाड यांनी दिली आहे.
पुर्णा शहरात मागील अनेक वर्षापासून लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती समाजबांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.यंदा मोठ्या उत्साहात बुधवारी जयंतीचे आयोजन केले आहे.दरम्यान सकाळी १० वाजेच्या सुमारास अण्णांच्या प्रतिमेचे पूजन, करुन मा.नगराध्यक्ष हाजी कुरेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण,यानंतर जाहीर सभा पार पडणार आहे. यावेळी आयोजित सभेत गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांचा भव्य नागरी सत्कार, प्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून संतोष एकलारे, मार्गदर्शक शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, उद्घाटक मा.नगरसेवक मधुकर गायकवाड, दिपप्रज्वलन नागेश एंगडे, सलीम कुरेशी यांच्या सह प्रमुख वक्ते म्हणून लालसेनेचे गणपत भिसे,प्रा.पी. डी.घोडेसर,मा.नगराध्यक्ष जाकीर कुरेशी, रिपाइंचे प्रकाशदादा कांबळे, उत्तम भैय्या खंदारे, प्राचार्य मोहनराव मोरे, अँड हर्षवर्धन गायकवाड, नितीन उर्फ बंटी कदम,अँड राजेश भालेराव आदीं सह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दुपारी १ वाजता शहरात वाजत गाजत अण्णाभाऊंच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन.जयंती मंडळाच्या वतीने विनोद गायकवाड,राज नारायणकर,दिपक बुरड, सुनिल गायकवाड,उत्तम गायकवाड, अमोल गायकवाड,रवि गायकवाड,रवि वाव्हळे,शाम खंदारे, सुधाकर गायकवाड आदींनी केले आहे.कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली असून यासाठी सिताराम गायकवाड,सुमित गायकवाड, टेकाजी गायकवा,प्रशांत गायकवाड,इंनि आकाश गायकवाड,प्रल्हाद गायकवाड, मधुकर गायकवाड,रवि जोनयात,राम जोनवाल,अनिल नारायणकर,सतिश नारायणकर,लखन कदम,सचिन गायकवाड,किसोर कांबळे,विशाल कांबळे, बंटी गायकवाड, सचिन गायकवाड, विकी भिसे, बालाजी गायकवाड, बंडु गायकवाड, मुन्ना घाटोळ,नामदेव गायकवाड, अविनाश गायकवाड, बापुराव गायकवाड, ओमकार गायकवाड ,कोंडीबा गायकवाड, आनंद गायकवाड, मोहन गायकवाड, नितीन गायकवाड, शाम गायकवाड, कपिल गायकवाड, मारोती गायकवाड, लक्ष्मण शाम गायकवाड, उमाकांत गायकवाड, सुंदर केदारे, गोविंद केशव गायकवाड, मनोज उबाळे, राजकुमार उबाळे, रामा उबाळे,चंद्रकांत गायकवाज,अनिल कांबळे, बंड आहिरे, महेश गायकवाड हे परिश्रम घेत आहेत.












