झिरोफाटा-पूर्णा रस्त्यावर झाड कोसळले; वाहतुकीस अडथळा

Spread the love

माटेगांवा जवळील रस्त्यावरील प्रकार;सा.बां विभागाचे दुर्लक्ष

पूर्णा/प्रतिनिधी

-झिरोफाटा-पूर्णा राज्य महामार्ग २४९ माटेगावांजवळ ऐन रस्त्यावर एक मोठे झाड रस्त्यावर कोसळले. असल्याची घटना ता. १६ एप्रिल रोजी सकाळी निदर्शनास आली या घटनेमुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली असून,सा.बां‌विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सायंकाळपर्यंतही झाड हटवण्यात आलेले नसल्याने वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
झाड रस्त्यावर कोसळल्याचे कारण अद्यापही समजू शकले नसून या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हे झाड रस्त्याच्या मध्यभागी आडवे पडल्याने या मार्गावरील वाहनांची वर्दळ पूर्णपणे ठप्प झाली आहे.घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत झाड हटवण्याचे कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नव्हते.वाहनचालकांना रस्त्याच्या बाजूने पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे.या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते वापर करणार्‍या रस्त्यावर झाड पडल्याने सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. या निष्क्रियतेबाबत नागरिकासह वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे स्थानिकांनी प्रशासनाकडे त्वरीत झाड हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी केली असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी झाडांची नियमित छाटणी व देखभाल करावी,अशी मागणी जोर धरत आहे.

You cannot copy content of this page