केदारनाथ महादेव,नंदी मुर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण

Spread the love

गोळेगावांत हरिनाम सप्ताह व शिवलिला अमृत कथेचे आयोजन;सात दिवस किर्तन महोत्सव

पूर्णा(प्रतिनिधी)
तालुक्यातील मौजे गोळेगांव येथे श्री. संत मोतीराम महाराज व श्री. संत दामाजी अप्पा यांच्या कृपा आशिर्वादाने श्री.केदारनाथ महादेव, नंदी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा कार्यक्रम बुधवार ता.१९ फेब्रुवारी रोजी पासून आयोजीत करण्यात आला आहे.यानिमीत्ताने ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्ताह व शिवलिला अमृतकथा किर्तन महोत्सवाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पूर्णा तालुक्यातील मौजे गोरेगांव येथे नुकतेच महादेव मंदिराची स्थापना करण्यात आली असून, मंदिरात श्री.केदारनाथ महादेव, नंदी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण करण्यात येणार आहे. बुधवार ता.१९ फेब्रुवारी रोजी पासून सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून,श्री.ह.भ.प. भागवत महाराज गोळेगावकर यांच्या वाणीतून शिवलिला अमृत कथा, दैनंदिन कार्यक्रमात पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी १० ते १२ कथा, सायं. ६ ते ८ धुपारती, रात्री ८ ते १० हरिकिर्तन बुधवारी श्री.ह.भ.प. अंगद महाराज माहेरकर,गुरूवार श्री.ह.भ.प. मोतीराम महाराज उमरथडीकर,शुक्रवार श्री.ह.भ.प. सिध्दांत महाराज सेलूकर,शनिवार श्री.ह.भ.प.मंचक महाराज गोळेगावकर, रविवारी श्री.ह.भ.प. मुंजाजी महाराज आरखेडकर,सोमवार श्री.ह.भ.प.गुलाब महाराज निळेकर,मंगळवार श्री.ह.भ.प.गजानन महाराज देऊळगावकर,बुधवार श्री.ह.भ.प. भागवत महाराज गोळेगावकर बुधवार.२६ सकाळी १० ते १२ श्री.ह.भ.प. राम महाराज मिरखेलकर यांचे होईल व नंतर फराळाचा कार्यक्रम होईल. व नंतर भंडाराची पंगत होईल. गुरुवारी २७ सकाळी ८ ते १०श्री. ह.भ.प. भागवत महाराज गोळेगावकर यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम होईल.दरम्यान मंगळवारी, दि.२५ रोजी गणपती पुजन, कलश पुजन, नवग्रह मुर्ती स्थापना, जलीधिवास -धान्यधिवास, फलधिवास, अग्नि स्थापना बुधवार, दि.२६ (महाशिवरात्री) रोजी सकाळी होम पुर्णावृत्ती बलिप्रदान, मुर्तीस्थापना व जलअभिषेक, रूद्रअभिषेक कलशारोहन कार्यक्रम पार पडणार आहे.तरी परिसरातील भाविकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोळेगांव ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page