श्री गुरुबुध्दिस्वामी महाविद्यालयाचे विद्यार्थी पोहचले जांभुळ बेटावर .
मानव्य विद्याशाखांतर्गत शैक्षणिक अभ्यास सहल
पुर्णा(प्रतिनिधी), दि.12 फेब्रुवारी 2025
येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयातील मानव्य विद्याशाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली शैक्षणिक अभ्यास सहल गोदावरी नदीच्या मधोमध असलेल्या जांभुळ बेटावर पोहचली.
पालम तालुक्यातील जांभुळ बेटावर गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या मानव्य विद्याशाखेतील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी यांनी दि.१२ रोजी भेट दिली. पर्यावरण जनजागृती व संवर्धन, पक्षी निरीक्षण, गोदावरी नदी पात्रातील जलसंवर्धनाची इत्यंभुत माहिती आणि वृक्षांविषयी माहिती घेतली तसेच तेथील सभोवताच्या परिसराचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला . त्यानंतर श्री संत मोतीराम महाराज मठ ,फळा ,ता.पालम, जि. परभणी येथे भेट दिली. सदरील श्री संत मोतीराम महाराज मठ संस्थानाची पार्श्वभूमी ,त्यांच्या कार्याची माहिती आणि तेथील प्रशासकीय व्यवस्थेचा अभ्यास करण्यात आला . सर्व विद्यार्थ्यांना मठ संस्थानाचा इतिहास, जीवन व कार्याची माहिती घेतली, मठ संस्थानाच्या वतीने केल्या जाणाऱ्या शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक कार्याची इत्यंभुत माहिती विद्यार्थ्यांना मिळाली . सदरील शैक्षणिक अभ्यास सहलीसाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील शैक्षणिक अभ्यास सहल यशस्वी होण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद अण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम, सहसचिव प्रा.गोविंदराव कदम , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार ,उपप्राचार्य ड. शिवसांब कापसे व डॉ. गजानन कुरुंदकर,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.संजय दळवी आणि महाविद्यालयातील प्रो.डॉ. पी .व्ही.भुताळे, डॉ. प्रकाश भांगे , डॉ.राजीव यशवंते ,विजय पवार, डॉ. वृषाली आंबटकर ,डॉ. रेखा पाटील ,डॉ. संदीप शिंदे ,डॉ. वर्षा धुतमल आणि प्रा.बालाजी असोरे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, भगुसिंग ठाकूर व कर्मचारी यांनी सहल यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.