Railway Buypass चुडावा-मरसूल रेल्वे बायपासला तीव्र विरोध
पूर्णेतील तहसीलसमोर शेतकऱ्यांचे निदर्शने लाक्षणिक साखळी उपोषण
पूर्णा ता.२१(प्रतिनिधी)रेल्वे विभागाच्या वतीने तालुक्यात प्रस्तावित केलेल्या चुडावा-मरसूल(Chudava-Marsul Railway Buypass)रेल्वे बायपासला जमिन बाधितांचा तीव्र विरोध होत असुन, सोमवार (ता.२१) रोजी पूर्णा तहसील कार्यालयासमोर बाधित शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. विविध पक्ष संघटनांच्या वतीने शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यात आला.
अकोला-पूर्णा ते मनमाड-नांदेड रेल्वे मार्गाला जोडण्यासाठी शहरापासून काही अंतरावर चुडावा- मरसुळ बायपास प्रशासनाने प्रस्तावित केलेला आहे.पूर्णा तालुक्यातील आडगांव,बरबडी,चुडावा,गौर शिवारातील शेकडो एकर शेत जमीन यासाठी अधीगृहीत केली जाणार आहे.त्यास शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होत आहे.पूर्णेत संबंधित शेतकऱ्यांनी साखळी उपोषण करुन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.यावेळी शेतकरी मुंजाजी सोनवळे, बळीराम गौंड, यादवराव जाधव, पंचफुला भुरे, नवनाथ दवणे, राजकुमार जोगदंड, विठ्ठल भोरे, भुजंग गौंड, प्रमोद सोलव, कैलास ठाकरे, भाऊराव सोनवळे, चांदू पारवे आदी शेतकरी साखळी उपोषणात सहभागी झाले. तालुक्यातील गौर, आडगाव (ला), बरबडी, मरसूल आदी गावांतील जमिनी चुडावा-मरसुल रेल्वे बायपासमध्ये जाणार आहेत. यापूर्वी समृद्धी महामार्गात शेतजमिनी मोठ्या प्रमाणात गेल्या. त्यापाठोपाठ शक्तिपीठ व या बायपाससाठी शेतजमीन अधिग्रहित करण्यासाठी प्रशासन सरसावले असून त्यास कडाडून विरोध होत आहे. या बायपासमुळे पूर्णा जंक्शनची किंमत उरणार नाही त्यामुळे तालुक्यातील विविध पक्ष संघटनांनी उपोषणस्थळी भेट देत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला.आम्ही आमच्या जमिनी या बायपास रेल्वे मार्गाला देणार नाहीत अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले. पूर्णेतील पत्रकार जगदीश जोगदंड, आ.डॉ. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे तालुका प्रभारी नितीन कदम, स्वराज्य पक्षाचे साहेब कल्याणकर, वंचितांचे सुनील मगरे, एमआयएमचे मोहम्मद शफीक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पारवे,निखिल धामणगावे, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे कॉ. नसीर शेख,बहुजन समाज पार्टीचे युवराज सूर्यतळ,धारबाजी गायकवाड, प्रहार संघटनेचे शिवहार सोनटक्के, विष्णू बोकारे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत कदम, नरेश जोगदंड, मुंजाजी जोगदंड, शिवशासन ग्रुपचे अध्यक्ष सोमनाथ सोलव,आदींनी उपोषणस्थळी भेट देत या शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.