रेल्वेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या १८५ प्रवाशांना पकडले;१ लाख ८० हजारांचा दंड वसूल

Spread the love

भरारी पथकाकडून नंदिग्राम व पटणा एक्सप्रेसह रेल्वे स्थानकांवरही झाडाझडती;

पूर्णा ता.३० (प्रतिनिधी)

नांदेड रेल्वे विभागाच्या वाणीज्य विभागाच्या भरारी पथकाकडून नांदेड, आदिलाबाद विभागातील रेल्वे स्थानकासह नंदीग्राम तसेच पटणा एक्सप्रेची झाडाझडती घेऊन विनाटीकीट प्रवास करणाऱ्या तब्बल १८५ फुकट्या प्रवाशांकडून सुमारे १ लाख ८० हजारांहून अधिक दंड वसूल केला आहे.

      रेल्वेस्थानकात आणि रेल्वे गाड्यांमध्ये  विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी रेल्वे विभागामार्फत तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येते.गुरुवारी २९ मे रोजी नांदेड विभागाचे व्यवस्थापक प्रदिप कामले यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेच्या वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. विजय कृष्णा,सहा व्यवस्थापक श्रीनिवास सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली नांदेड-आदिलाबाद विभागात एक विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविली.मोहीमेत  नंदीग्राम व पूर्णा-पटना एक्सप्रेस गाड्यांची कसून तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान, अनधिकृत विक्रेते, तिकिटे नसलेले प्रवासी तसेच सीझन तिकीट किंवा जनरल तिकिटांसह आरक्षित डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्यां तब्बल १८५ जणांना पथकाने पकडून दंडात्मक कारवाई केली.यावेळी सुमारे १ लाख८० ऐंशी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.यापथकात नांदेड ८ तिकीट तपासणीस तर आदिलाबाद विभागातील ३ वाणिज्य निरीक्षक मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

प्रवाशांनी टिकीट घेऊनच प्रवास करावा प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड

योग्य तिकीट घेवूनच रेल्वे परिसर आणि रेल्वे गाड्यांमध्ये प्रवेश करावा आणि दंडात्मक कार्यवाही टाळावी. अशा प्रकारची तिकीट तपासणी मोहीम विभागातील इतर स्थानकांवर तसेच रेल्वे गाड्यांत करण्यात येईल .ही दंडात्मक  कारवाई रेल्वे प्रवाश्यांची सुव्यवस्था राखण्यासाठी आणि प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायी  प्रवास अनुभव सुनिश्चित करण्याची वचनबद्धता अधोरेखित करते.

You cannot copy content of this page