South Central Railway छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा मार्ग मोकळा;२,१७९ कोटी रुपयांचा निधी देत केंद्राची अंतिम मंजुरी

Spread the love
पूर्णा ता.३१ (प्रतिनिधी)
परभणीकरांची अनेक दिवसांची प्रतिक्षा संपली असुन, केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत ‘छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्राची अंतिम मंजुरी देत केंद्राने तब्बल २ हाजार १७९ कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे.यामुळे आता सिकंदराबाद ते मनमाड मार्गावरील रखडलेल्या १७७ किमीच्या दुहेरीकरण कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
परभणी जिल्ह्यासह मराठवाड्या तील जनतेला (Central Government)केंद्र सरकारने दिलासा दिला आहे.दिल्ली येथे आज गुरुवारी (ता.३१) रोजी केंद्रीय मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत(chatrapati Sambhajinagar to Parbhani Railway Double line work)छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वेच्या दुहेरी मार्गाला अंतिम मंजुरी मिळाली असून यासाठी २,१७९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.त्यामुळे आता १७७ किमीच्या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा मार्ग साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.छत्रपती संभाजीनगर ते परभणी यादरम्यान रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार आहे’.‘दुहेरीकरणाचा फायदा केवळ नियमित प्रवाशांनाच नाही, तर शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, व्यावसायिक आणि मराठवाड्यातील उद्योगांनाही होणार आहे. शिवाय रेल्वे गाड्यांची संख्या वाढुन संपूर्ण मराठवाड्याची मुंबई पुणे, कोल्हापूर,सह उत्तर भारतातील कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे’,

You cannot copy content of this page