थुना नदीला पूर,पूर्णा-झिरोफाटा रस्ता वाहतुकीसाठी बंद

Spread the love

माटेगांवाजवळ वाहनांच्या रांगा; धोकादायक प्रवास टाळण्याचे प्रशासनाचे आवहान

पूर्णा ता.१५(प्रतिनिधी)

Parbhani rain news परभणी हिंगोली जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे पुर्णा तालुक्यातुन वाहणाऱ्या थुना नदीला पुर आला असून, तालुक्यातील माटेगांव येथे पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. शुक्रवारी (ता.१५) रोजी पहाटे ४ वाजेपासुन(purna-zhirophata road closed) झिरोफाटा-पुर्णा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.पावसाचा जोर ओसरल्यास सायं पर्यंत पाणी ओसरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.वाहनधारकांनी येथून प्रवास करणे टाळावे असे आवाहन पो.नि.विलास गोबाडे यांनी केले आहे.

Oplus_16908288

झिरोफाटा- पूर्णा रस्त्यावरील माटेगांव येथे थुना नदीचं पाणी पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या पर्यायी रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास माटेगांव येथील पोलिस पाटील वंदना स्वामी,कमलबाई बोबडे,उपसरपंच सोपानकाका बोबडे आदीं ग्रामस्थांनी पो.नि.विलास गोबाडे यांना कळवले. गोबाडे यांनी रस्त्यावर पुराचे पाणी पहाणी करुन संबंधित पुलाच्या कामावरील कंत्राटदाराकरवी आवश्यक सुचना फलक लावण्या सांगितले.येथिल पाणी जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.तालुक्यात जरी कमी अधिक प्रमाणात पावसाची रिपरिप गुरुवारी सकाळपासून आहे मात्र पावसाचा जोर तसा मोठा नाही मात्र शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील काही महसूल मंडळामध्ये समाधान कारक पाऊस झाल्याने थुना नदीला पूर आला असल्याची माहिती आहे.

पूर्णा-थुना नदीला पूर आल्याने सुरक्षात्मक उपाययोजना करत बंदोबस्तावर तैनात माटेगांवच्या पोलीस पाटील वंदना स्वामी

            पूर्णा तालुक्यात जुन जुलै महिन्यात सरासरी पेक्षा अत्यल्प प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली.जवळपास दिड महीना पावसाने हजेरी लावली नव्हती त्यामुळे खरीपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसांपासून वरुणराजाने कृपा दृष्टी दाखवली आहे.तालुक्यात आॅगस्ट महीन्यात समाधान कारक पाऊस झाल्याने बळीराजाची चिंता काही प्रमाणात का होईना मात्र दूर झाली आहे.       

      परभणी जिल्ह्यातील धरणाच्या पाणी पातळी मध्ये मोठी वाढ झाली असल्याचे दिसून येत असून,येलदरी जलाशय ९२ टक्के तर सिद्धेश्वर जलाशयात ८७ टक्के भरले आहे.हवामान विभागाने  पुढील ४८ तासात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा ईशारा दिला असल्याने  तहसील प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन तसेच पोलिसांना सुचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील येलदरी धरणातुन पाणी सोडले जात आहे.सध्य स्थितीत अतिवृष्टी होत असल्यामुळे तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनास दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.परिस्थितीवर प्रशासनाची बारीक लक्ष असल्याचे तहसीलदार माधवराव बोथिकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

You cannot copy content of this page