राजकोट-महेबूबनगर विशेष गाडी १८ फेऱ्यात धावणार

Spread the love

पूर्णा (प्रतिनिधी)

दक्षिण मध्य रेल्वे विभागातील प्रवाशांची मागणी लक्षात घेवून राजकोट-महेबूब नगर-राजकोट दरम्यान विशेष गाडीच्या १८ फेऱ्या चालवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

गाडी क्रमांक ०९५७५ राजकोट ते महेबूब नगर विशेष गाडी : हि गाडी राजकोट येथून दर सोमवारी मार्च महिन्यात ०३,१०,१७,२४ आणि ३१ तारखेला, एप्रिल महिन्यात०७,१४,२१ आणि २८ तारखेला, मे महिन्यात ०५,१२,१९ आणि २६ तारखेला, जून महिन्यात,०२,०९,१६,२३,२९ आणि ३० तारखेला सुटेल. हि गाडी राजकोट येथून सोमवारी दुपारी १;४५ वाजता सुटेल आणि वान्कानेर ज., सुरेंद्रनगर, अहमदाबाद, गेरतपूर , नदीयाड, आनंद, वडोदरा, सुरत, उधना, नंदुरबार, पालधी, जलगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निझामाबाद, कामारेद्दी, मेद्चल, काचीगुडा, उम्दानगर, शादनगर, जडचेरला मार्गे महेबूबनगर येथे मंगळवारी रात्री ८ वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ९५७६ महेबूब नगर ते राजकोट विशेष गाडी : हि गाडी महेबूबनगर त्याच मार्गाने मेहबूब नगर येथून दर मंगळवारी मार्च महिन्यात ०४, ,११,१८ आणि २५ तारखेला, एप्रिल महिन्यात०१,०८,१५,२२ आणि २९ तारखेला, मे महिन्यात ०६,१३,२० आणि २७ तारखेला, जून महिन्यात०३,१०,१७ आणि २४ तारखेला आणि जुलै महिन्यात ०१ तारखेला सुटेल. हि गाडी महबूबनगर येथून दर मंगळवारी रात्री ८;१० वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच राजकोट येथे गुरुवारी सकाळी ५ वाजता पोहोचेल. या गाडीस जनरल, स्लीपर आणि वातानुकुलीत असे एकूण २२ डब्बे असणार आहेत.

You cannot copy content of this page