IIPAनवी दिल्ली,नांदेड शाखेच्या कार्यकारिणी सदस्यपदी-डॉ.रवी बरडे

Spread the love

पूर्णा ता.२७(प्रतिनिधी)

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नवी दिल्ली ही भारत सरकारच्या कर्मचारी ,लोकतक्रार व निवृत्तीवेतन मंत्रालयाअंतर्गत लोकप्रशासन विकास , प्रशिक्षण, संशोधन व प्रशासकीय सुधारणा या महत्वपूर्ण क्षेत्रात कार्य करणारी एक मूलभूत संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे.

केंद्र शासनाच्या ( आय. आय.पी. ए.) नवी दिल्ली यांच्याकड़ून नांदेड येथील स्थानिक शाखेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा नांदेडचे जिल्हाधिकारी मा.श्री राहुल कर्डीले यांची निवड करण्यात आली असुन शाखा उपाध्यक्षपदी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मेघना कावली यांची तर कार्यकारिणी सदस्यपदी श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा येथील डॉ. रवी बरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करणा-या महत्वपूर्ण संस्थेत प्रा. डॉ. रवी बरडे यांना संधी प्राप्त झाल्याबदल संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोदअण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम,कोषाध्यक्ष उत्तमरावजी कदम, सहसचिव गोविंदराव कदम,प्राचार्य डॉ.के. राजकुमार, उपप्राचार्य डॉ.गजानन कुरुंदकर,डॉ शिवसांब कापसे,पर्यवेक्षक उमाशंकर मिटकरी,उपप्राचार्य प्रा.सी. आर.डाफणे, डॉ.जितेंद्र पुल्ले,डॉ.संजय दळवी,डॉ.रवींद्र राख, डॉ. प्रकाश भांगे,डॉ.राजू शेख,डॉ.सोमनाथ गुंजकर, एस.टी शेख, एम.बी.अंबेकर, पी.आर.मित्रे बाळासाहेब कुलकर्णी, ्वसंतराव कदम, अशोकराव कदम, अनंत पाटील,सुभाष भालेराव, साईनाथ भालेराव या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page