महसूल विभाग ॲक्शन मोडवर;पूर्णा तालुक्यात तहसीलदार,नायब तहसीलदारांची गौण खनिज माफिया विरोधात धडक कारवाई

Spread the love

झिरोफाटा,कळगांव येथे शुक्रवारी पहाटे छापे; १ मातीचा हायवा टिप्पर,दोन तराफे जाळले,३५ हजारांची वाळू जप्त

पूर्णा(प्रतिनिधी)
मागील दोन दिवसांपासून तालुक्यात अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्करून करून त्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यासाठी पूर्णा महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून तहसीलदार बोथीकर व नायब तहसीलदार थारकर हे आप आपल्या पथकासह शुक्रवार ता.१४ रोजी भल्या पहाटे पथकास रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. त्यांनी तालुक्यातील झिरोफाटा व कळगांव येथे थेट कारवाई करीत एक मातीने भरलेला हायवा टिप्पर जप्त करत, वाळू उपसा करणारी तर दोन तराफे ताब्यात घेऊन जाळली आहेत तसेच ३५ हजार रुपयांची वाळू जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
      मागील तीन ते चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकांपासून स्थानिक महसूल विभागाकडून गौण खनिज माफिया विरोधात केल्या जाणाऱ्या कारवाया थंडावल्या असल्याच्या बातम्या स्थानिक माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर पूर्णा महसूल विभाग तातडीने ॲक्शन मोडवर येऊन थेट धडाकेबाज कारवायांना सुरुवात केली आहे.शुक्रवारी १४ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास तहसीलदार माधवराव बोथिकर तसेच नायब तहसीलदार प्रशांत थारकर हे रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. तहसीलदार बोथिकर यांनी महसूल विभागाचे कर्मचारी नंदकुमार शेलाटे, मुरलीधर मोरे, गौतम घाटे, गंगाधर सातपुते, जोगदंड आदींना सोबत घेऊन तालुक्यातील कातनेश्वर एरंडेश्वर शिवारात गस्त लावली होती. सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एरंडेश्वर शिवारातील झिरोफाटा जवळ या पथकाच्या गळाला पिंपळगाव कडून वसमत कडे पाच ते सहा ब्रास अवैध माती घेऊन जाणारा (एम.एच.४०/वाया/४६८३) क्रमांकाचा हायवा टिपर आढळून आला. सदरील टिपरला या पथकाने ताब्यात घेऊन तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आले आहे. या हायवा टिप्परला तहसीलदारांनी सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

तहसीलदार नाय तहसीलदार रस्त्यावर पण तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयातच..
मागील काही दिवसांपासून स्थानिक महसूल विभागाकडून अवैध गौण खणीज उपशा विरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान त्यातच तहसीलदार व नायब तहसीलदार हे आता ॲक्शन मोडवर आले असून ते थेट रस्त्यावर उतरून कारवाया करत आहेत. परंतु तालुक्यातील अनेक गावांमध्ये महसूल विभागातील सज्जांचे तलाठी व मंडळ अधिकारी हे मात्र अद्यापही कार्यालय सोडून बाहेर निघण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. महसूल विभागाच्या वरिष्ठांनी याची गंभीर दखल घेऊन त्यांनाही या कामी तैनात करावे तरच तालुक्यात सुरू असलेल्या बेफाम गौण खनिज उपशाला लगाम लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

You cannot copy content of this page