पूर्णा महसूल पथकाने पकडला अवैध वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर
नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांची छापेमारी; लक्ष्मणनगर शिवारातील कारवाई;१ लाख ५५ हजारांचा दंड
पूर्णा (प्रतिनिधी)
मागील काही दिवसांपासून पूर्णा महसूल विभागाकडून अवैध वाळू उपसा तसेच अवैध वाळू वाहतूकीवर करण्यात येणाऱ्या कारवाई थंडावल्यामुळे तालुक्यातील पूर्णा व गोदावरी नदी काठच्या गावात वाळू चोरीला उधाण आले होते. वाळू माफीयांचे कर्दनकाळ, येथिल महसुल विभागाचे महसूल सिंगल म्हणून ओळख असलेले नायब तहसीलदार प्रशांत थारकर हे पुन्हा एकदा अँक्शनमोडवर आले आहेत.थारकर यांनी पथकासह बुधवारी ता.१२ रोजी तालुक्यातील पिंपळगाव (बा)-लक्ष्मणनगर रस्त्यावरील लक्ष्मणनगर शिवारात पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास छापा घातला. यावेळी त्यांचे हाताला वाळूची अवैध वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर लागला असून त्यांनी सदरील ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तहसील कार्यालय जमा करून त्यास १ लाख ५५ हजारांचा दंड ठोठावला आहे.
पूर्णा तालुक्याला गोदावरी व पूर्णा नद्यांचे उत्तुंग पात्र लाभलेले आहे.त्यामुळे येथे वाळू तस्करही मोठ्या प्रमाणात होत असते.मात्र विधानसभेच्या निवडणुकी पासून येथील महसूल प्रशासनाच्या अवैध वाळू उपसा वाहतूकीवर कार्यवाई करण्यासाठी उदासीनता निर्माण झाली होती.तालुक्यात कार्यरत असलेले, उपविभागीय अधिकारी,तहसीलदार ,नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी,तलाठी केवळ बघ्याची भूमिका घेत होते.दरम्यान मागील महीन्यात थारकर यांच्या पथकाने मुंबर येथे गोदावरी नदी पात्रात बोट द्वारे सुरू असलेल्या वाळू उपसा ठिकाणावर कारवाई केली होती.कान्हेगांव, पिंपळगाव (बा) शिवारातील पूर्णा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून वाहतूक केली जात असल्याची चर्चा होती. अवैध वाळू उपस्याला लगाम घालण्यासाठी पुन्हा एकदा थारकर यांनी कंबर कसली ते.मंगळवारी ११ रोजी मध्यरात्री तलाठी सिद्धार्थ खिल्लारे, नंदकुमार शेलाटे,मुरली मोरे यांचे पथक सोबतीला घेऊन पिंपळगाव (बा) शिवारात गस्तीवर होते.दरम्यान बुधवारी सकाळी त्यांना पिंपळगाव ते लक्ष्मणनगर रस्त्यावरील लक्ष्मणनगर शिवारात लाल रंगाचे विना नंबरचे एक ट्रॅक्टर ट्राॅली मध्ये अवैधरित्या वाळू घेऊन जात असताना पथकाने ताब्यात घेतले.सदरील ट्रॅक्टर कार्यवाही करीता येथिल तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे. या प्रकरणी तहसीलदार माधवराव बोथिकर यांनी कारवाई करण्यात आलेल्या जप्त ट्रॅक्टरला १ लाख ५५ रुपये दंड ठोठावला आहे.