पूर्णेतील महसूल प्रशासनाचा लोकहितवादी निर्णय;३ गावातील स्मशानभूमीचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवला

Spread the love

धानोरा(का),पिंपळा(लो),ममदापूर गावच्या स्मशानभूमीचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली

पूर्णा(प्रतिनिधी)

अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसलेल्या गावात पूर्णा महसूल प्रशासनाने जनतेसंबंधी लोकहीतवादी निर्णय घेतला असून, तालुक्यातील धानोरा काळे, ममदापूर, पिंपळा लोखंडे येतील गावकऱ्यांच्या सुविधेसाठी शासनाच्या गायरान जमिनीतून स्मशानभूमीला काही जागा देऊ केली आहे त्यामुळे सदरील गावातील स्मशानभूमीचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली लागला आहे.    

 देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षाचा काळ लोटला आहे.एकीकडे जगासह देशही वा-याच्या वेगाने प्रगती साधत आहे.दुसरीकडे मात्र काही जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागातील जनता आजही नागरीसोई सुविधेपासुन वंचित आहे.पूर्णा तालुक्यातील मौजे लोखंडे पिंपळा, धानोरा काळे, ममदापूर येथिल ग्रामस्थ मागील अनेक वर्षांपासून गावांत स्मशानभूमी व्हावी यासाठी प्रयत्नशील होते.परंतु जागेअभावी हा प्रश्न कायम होता.स्थानिक प्रशासनाकडे जागेची उपलब्धता करुन द्यावी यासाठी पाठपुरावा सुरू केला होता.या तीन्ही गावच्या ग्रामस्थांच्या मागणीची दखल येथिल तहसीलदार माधवराव बोथिकर व ना.त.प्रशांत थारकर, स्थानिक मंडळ अधिकारी,तलाठी यांनी घेतली.त्यांनी जिल्हाधीकारी रघुनाथ गावडे, उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली १०० दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत प्रशासनाकडून संबंधित ग्रामस्थांच्या स्मशानभूमीसाठी शासकीय जमिन अधिग्रहित करुन नियमानुसार संबंधित ग्रामपंचायतीच्या ताबा पावती करुन ताब्यात दिल्या आहेत.     

पिंपळा लोखंडे येथे गावालगतच्या गायराण जमीन गट क्र.१ मधून २० गुंठे जागा,तर धानोरा काळे येथे गट क्रं.२३ मधून २० गुंठे,तर ममदापूर येथे गट क्रं.१. मध्ये २० गुंठे जमीनीचा आज तहसीलदार माधवराव बोथिकर,प्रशांत थारकर संबंधित गावातील मंडळ अधिकारी ,तलाठी यांनी चावडीवर जाऊन स्थायिक सरपंच , ग्रामसेवक ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदरील स्मशानभूमीची जागेची ताबा पावती करुन दिली. प्रशासनाने आज तालुक्यातील तीन गावातील ग्रामस्थांच्या स्मशानभूमीचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली काढल्याने ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाचे आभार मानले जात आहे.          

You cannot copy content of this page