कंत्राटदाराचा हलगर्जीपणा नडला;रस्ता कामावर दिशादर्शक फलक नसल्याने दुचाकीस्वाराचा अपघात
पूर्णा शहरातील राजमुद्रा चौकातील घटना; घटनेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी
पूर्णा(प्रतिनिधी)
पूर्णा(प्रतिनिधी)
सा.बां विभागाच्या साईड इंजिनिअर कडून शहर परिसरात रस्ता बांधकाम करणाऱ्या मर्जीतील कंत्राटदारांने सदर रस्त्यावर काम सुरू असल्याचे, रस्ता खोदून ठेवल्याचे, बाह्य वळणं वापरण्याचे कोणतेही दिशादर्शक फलक लावण्यासाठी दाखवलेल्या हगर्जीपणामुळे अखेर त्यांचे परिणाम शुक्रवारी ता.७ रोजी रात्री दिसून आले.येथील झिरोफाटाकडे जाणा-या रस्त्यावरील राजमुद्रा चौकात एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
पूर्णा शहरातून झिरोफाटा रस्त्यावर सुरू असलेले नाला व रस्ता बांधकाम वाहनधारकांची डोकेदुखी ठरू लागलेल्या या कामावर शुक्रवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास एक( एम.एच /22 ए यु /0065) वरील पूर्णा तालुक्यातील आलेगांव येथील दुचाकीस्वार राहुल नागोराव धुमाळे व विठ्ठल उबाळे हे दोघे परभणीहुन या रस्त्याने गावाकडे जात असताना रस्त्यावर कोणतेही दिशादर्शक फलक नसल्याने त्यांची दुचाकी खोदून ठेवलेल्या रस्त्याच्या खाडीच्या ठिगारावर जाऊन आदळल्याने दुचाकीवरील दोघे अपघात ग्रस्त होऊन जखमींवर कोसळले यात दोघांना गंभीर ईजा झाली.काही नागरिकांनी त्यांना उपचारासाठी पुर्णा शहरातील रुग्णालयात दाखल केले परंतु गंभीर चिंताजनक जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.यातील एका युवकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.अपघात घडल्याचे समजताच पुर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्षतीग्रस्त झालेले वाहन ताब्यात घेऊन याप्रकरणी घटनेची नोंद केली असल्याचे समजते.
पूर्णा शहरातील एस्सार पेट्रोल पंप ते राजमुद्रा चौकात समोर पर्यंतच्या झिरोफाटा रोडवर रस्त्याचे सिमेंट काॅक्रेटीकरण तसेच दुतर्फा नाला बांधकाम मागील वर्ष भरापुर्वी हाती घेतले आहे.संबंधीत कंत्राटदाराने नाला बांधकाम व काही मीटर रस्त्यावर सिमेंट काॅक्रेटीकरण करून एका बाजूचा रस्ता खोदून ठेवला आहे.जागोजागी रस्ता बांधकाम करण्यासाठी खडी,मुरुमाचे ठिगारे पडलेल्या अवस्थेत आहेत.रस्त्यावर काम सुरू असल्याचे दिशादर्शक फलक तसेच बाह्यवळण असल्याचे फलक देखील लावण्यात आलेले नाहीत, नांदेड कडून शहरात ये-जा करण्यासाठी एकमेव हाच रस्ता असल्याने वाहतूकदारांना येथून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे.खोदलेल्या कामावर पाणी शिंपडले जाते नसल्याने बेसुमार धुळ उडत आहे तर जागोजागी पडलेल्या खडी व मुरमावर अनेक वाहन धारक अपघात ग्रस्त होते आहेत.सा.बां विभागाच्या वतीने रस्त्याचे काम निरीक्षण करण्यासाठी नियुक्त केलेले अभियंता यांना शहरातील नागरिकांनी वारंवार याबाबत तक्रार करुनही सदर काम पुर्णत्वास गेले नाही तर अडीअडचणी सोडविण्यासाठी बंदोबस्तही करण्यात आलेला नाही.कित्येक दिवसांपासुन पचणी पडलेलं कामं जनतेची सुरक्षा लक्षात घेऊन तरी सा.बां विभाग हे काम तातडीने पूर्ण करणार आहे अशी विचारणा होत आहे.
_____________________________
पूर्णा शहर परिसरात सुरू असलेल्या रस्ता व नाला बांधकामात कंत्राटदार व निरीक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या अभियंता कडून कामात हलगर्जीपणा होत आहे.त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत.आता सा.बां विभागाचे वरिष्ठ यात लक्ष घालून हलगर्जीपणा करणा-या अभियंता तसेच कंत्राटदारावर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.










