पोलिस असल्याची बतावणी करून वयोवृद्धाच्या सोन्याच्या अंगठ्या पळवल्या
पूर्णा शहरातील प्रकार;जुन्या वापरातील ८० हजारांच्या किंमतीच्या अंगठ्या लंपास;अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
पूर्णा(प्रतिनिधी)
पोलिस असल्याचे ओळखपत्र दाखवून आम्ही पोलीस आहोत,शहरात दंगा होत आहे म्हणत एका ७२ वर्षीय वयोवृद्ध सेवा निवृत्त कृषी सहाय्यक कर्मचाऱ्या जवळील जुन्या वापरातील सुमारे ८० हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या दिवसाढवळ्या पळवल्याची घटना घडल्या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात ता.१० एप्रिल गुरुवारी दोघां अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामराव भुजगराव गव्हाणे, वय ७२ वर्ष, सेवानिवृत कृषी सहाय्यक रा.आदर्श काॅलनी पुर्णा जि. परभणी असं त्या फसवणूक झालेल्या वयोवृद्धाचे नांव आहे. घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की,त्यांचा मुलगा हरिष गव्हाणे हे परगावी गेल्याने ता.८ रोजी ते मुलाच्या कमाल टाॅकीज परिसरातील मेडीकल दुकानावर आले होते.दुपार पर्यंत व्यापार करुन ३ वाजण्याच्या सुमारास ते दुकान बंद करून घरी जात असताना चिटणीस काॅलनी जवळील रस्त्यावर दोन अनोळखी इसमांनी अडवून त्यांना पोलीसांचे ओळखपत्र दाखवत ,आम्ही पोलीस आहोत असे सांगुन त्याच्या जवळचे पुढे दंगा होत आहे.तुम्ही तुमच्या हातातील अंगठ्या काढुन खिशात ठेवुन जा असे सांगीतल्याने त्यांनी हातातील अंगठ्या काढुन खिशात ठेवताना त्यापैकी एकाने त्याच्या जवळचा कागद देऊन या कागदामध्ये तुमच्या अंगठ्या ठेवा असे म्हणुन त्याने त्या अंगठ्या कागदामध्ये पुडी करुन ठेवल्या व अंगठ्या असलेला कागद त्याने स्वतःच्या खिशात ठेवला हात चलाखी करत त्याने खिशातील दुसरी पुडी परत करुन ही पुडी खिशामध्ये ठेवा व निवांत घरी जा असे सांगून ते दोघे मोटारसायकल वर निघुन गेले, थोड्या वेळाने खिशातील कागद काढुन पाहीले असता त्या कागदामध्ये दोन दगडाचे छोटे खडे दिसले तेव्हा माझी फसवणुक झाली असल्याचे लक्षात आले ते घाबरुन घरी निघुन गेलो. झालेली घटना घराशेजारी राहणारे कैलास रुस्तुम इंगोले व सुरेश गव्हाणे यांना सांगुन आम्ही तिघे ज्या ठिकाण वरुन माझया अंगठया चोरी झाल्या तेथे आलो, आजुबाजुला व परीसरात चोरट्यांचा शोध घेतला ते मिळुन न आल्याने या.१० एप्रिल रोजी त्यांनी पूर्णा पोलीसांत दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून कलम ४२०,४०६,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाअसून,पो.नि. विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सोमेश्वर शिंदे हे तपास करीत आहेत.