समृद्धी महामार्गासाठी चुकीच्या मुल्यांकन प्रकरणात कृषी विभागातील ७ जणं निलंबित..

Spread the love

तत्कालीन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी या प्रकरणात चौकशी केली होती. चौकशी अंती शासनाकडून संबंधित सात अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई;कृषी विभागाचे कक्ष अधिकारी नितीन शेळके यांनी या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश

परभणी(प्रतिनिधी).जालना- नांदेड समृद्धी महामार्गात जाणाऱ्या जमिनीवरील वृक्षांचे मुल्यांकन चुकीच्या पद्धतीने वाढीव पद्धतीने दिले होते असा ठपका लावत जिल्ह्याच्या सेलू येथील कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी ते कृषी पर्यवेक्षकापर्यंतच्या ७ जणांना निलंबित करण्यात आले असल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. कृषी विभागाचे कक्ष अधिकारी नितीन शेळके यांनी या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. या निलंबित अधिकाऱ्यांवरती. मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दोन वर्षांपूर्वी या प्रकरणात चौकशी केली होती. चौकशी अंती शासनाकडून संबंधित सात अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

जालना समृध्दी महामार्गाची घोषणा झाली. या मार्गासाठी जमिनीचं अधिग्रहण करण्यासाठी जी यत्रंणा असते, त्यांनी हे मूल्यांकन अतिशय चुकीच्या पद्धतीने या अधिकाऱ्यांनी दिलं होतं, असा आरोप त्यांच्यावरती होता. या मार्गावरील वृक्षांचं मूल्यांकन होतं, ते तपास अधिकारी आंचल गोयाल यांनी यांनी सांगितलं की, ९ ते १० कोटी मध्ये बसणार मुल्यांकन या ७ अधिका-यांनी वाढीव पद्धतीने तब्बल १०० कोटी रुपयांवर नेऊन ठेवले.ते अतिशय चुकीचं होतं. या प्रकरणात त्यांची फेर चौकशी केली आणि पाहणी केली असता या अधिकाऱ्यांनी वाढीव मूल्यांकन दिल्याचं समोर आलं आहे.

राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी या निलंबनाच्या आदेश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. पहिल्यांदाच अशा पद्धतीची मोठी कारवाई होत आहे. यामध्ये कृषी विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यापासून ते कृषी पर्यवेक्षकांपर्यंत जवळपास सात जणांना एकाच वेळी निलंबित करण्यात आला आहे. यानंतर आता महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणार का हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. यामध्ये संयुक्त पाहणी त्याच्या अहवाल महसूल विभाग, कृषी विभाग यांच्याकडून देण्यात येतो त्यानुसार हा अहवाल चुकीचा होता त्यावरती आता कारवाई करण्यात आलेली आहे.

यांना केलंय निलंबित…

1)उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र हरणे, 2)तालुका कृषी अधिकारी शेरन ताजमोहंमद पठाण, 3)रामप्रसाद जोगदंड मंडळ कृषी अधिकारी चिकलठाणा, 4)अशोक कदम कृषी अधिकारी सेलू, 5)राजहंस खरात मंडळ कृषी अधिकारी, 6)प्रकाश लोहार कृषी पर्यवेक्षक, 7)दिगंबर फुलारी कृषी पर्यवेक्षक सेलू

You cannot copy content of this page