सौ.मीरा यसके समता साहित्य अकादमीच्या पुरस्कारांने सन्मानीत
पूर्णेत शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
पुर्णा ता.३१ (प्रतिनिधी)
समता साहित्य अकादमी, नवी दिल्ली व भारतीय साहित्य संस्कृती अकादमी यांच्या वतीने दिल्या जाणारा ” राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आयकॉन अवॉर्ड २०२५” व रजत पदक येथील गृह उद्योजिका मीरा संजय यशके यांना शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम याचां हस्ते प्रदान करण्यात आला.
मागील महिन्यात हा या पुरस्कारांचे वितरण दिल्ली येथे नियोजित होते पण भारत पाक युध्दाच्या पार्श्वभूमीवर देशातील विमानसेवा बंद होती त्यामुळे या पुरस्काराचे वितरण झाले नव्हेत म्हणून समता साहित्य अकादमीने हा पुरस्कार त्याचां प्रतिनिधी मार्फत पुर्णा येथे वितरणासाठी पाठवला तेव्हा या पुरस्काराचे वितरण
जिल्हाप्रमुख विशाल कदम, रूपाली कदम, यांच्या हस्ते यशके कुटुंबास करण्यात आले. यावेळी संजय यशके, जगदीश जोगदंड आदि सह आदींसह मान्यवर उपस्थित होते.