संत जनाबाईंच्या पालखीचे सोमवारी पंढरीकडे प्रस्थान

Spread the love
गंगाखेड ता.21(प्रतिनिधी) 
   दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने येथील संत जनाबाई संस्थानची पालखी सोमवार 23 जून रोजी दुपारी 1 वाजता श्रीक्षेत्र पंढरपुरकडे प्रस्थान करणार आहे.
संत जनाबाईचा पालखी प्रस्थान सोहळा दरवर्षी अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहात पार पडत आला आहे. नारीशक्ती, भक्ती आणि वारकरी सांप्रदायाच्या महान परंपरेचे प्रतीक असणारा हा प्रस्थान सोहळा गंगाखेडवासीयांसाठी अभिमानाचा आणि भक्तीपूर्ण पर्वणीचा ठरला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत जनाबाईच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्ताने गंगाखेडवासीयांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सोमवार 23 जून रोजी दुपारी 1 वाजता ही पालखी पंढरपुरकडे प्रस्थान करणार आहे.

You cannot copy content of this page