विभागीय आयुक्तांच्या हस्ते पूर्णा तहसिलदार बोथिकरांचा गौरव

Spread the love

‘सस्ती अदालत’ उपक्रमात परभणीतील पूर्णा तालुका अव्वल;

पूर्णा ता.३०(प्रतिनिधी)

शेतकऱ्यांच्या रस्त्याबाबतच्या समस्या  समन्वयाने सोडवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सस्‍ती अदालत’ उपक्रमामध्‍ये तालुकास्तरांवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या यादीत परभणी जिल्‍हयातील पूर्णा तहसील कार्यालयाने नामांकन मिळवले आहे.छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी ता.३० मे रोजी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत पूर्णा तहसीलदार माधवराव बोथीकर यांना गौरविण्यात आले.

    तहसिल कार्यालयात किंवा गरजेनुसार मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी “सस्ती अदालत” या नावाने विभागातील आठही जिल्हयांमध्ये सस्ती अदालत हा उपक्रम राबविण्याबाबत येत आहे.सदरील उपक्रमांतर्गत पूर्णा तालुक्यातील महसूल विभागाने तालुक्यातील “सस्ती अदालतीचे” आयोजन करत ११० प्रकरणांपैकी तब्बल ५६ प्रकरणं निकाली काढून ३४ प्रकरण स्थळं पाहणीसाठी राखीव ठेवली आहेत.उक्त उपक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातून पूर्णा तहसील कार्यालयाने सर्वोच्च स्थान पटकावले आहे. शुक्रवारी विभागीय आयुक्त दिपक गावडे यांच्या हस्ते पूर्णा तहसिलदार माधवराव बोथिकर यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, निवासी जिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

You cannot copy content of this page