पूर्णा अकोला लोहमार्गा वरील हिंगोली स्थानकावर ‘द बर्निंग ट्रेनचा’थरार

Spread the love

रेल्वेला लागली आग; एनडीआरएफचे मॉक ड्रिल;प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास

पूर्णा/प्रतिनीधी:

अकोल्याकडे जाणाऱ्या लोहमार्गावरील हिंगोली स्थानकांवर अक्षरशःआग लागल्याचे दृश्य घटनास्थळी एन.डी.आर. एफच्या तुकड्या,अग्निशमन दलाचे बंब ,सैरावैरा पळत सुटलेले नागरिक हे दृश्य पाहून काळजाचा ठोका चुकावा ईतपत बाका प्रसंग आज मंगळवारी ता.२२ एप्रिल रोजी सकाळी पहावयास मिळाला.परंतु नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने अगदीच ‘द बर्निंग ट्रेन’ चित्रपटातील दृश्याप्रमाणे रेल्वेला आग लागल्याचे चित्र उभे करण्यात आले.सदरील प्रकार हा रेल्वेच्या आपात्कालीन यंत्रणा तप्पर आहे की नाही हे तपासण्यासाठी रेल्वेच्या वतीने करण्यात आलेला माॅकड्रील असल्सियाचे समजल्यावर उपस्थितांनी निःश्वास सोडला.

नांदेड रेल्वे विभागाच्या आपात्कालीन यंत्रणेला मंगळवारी सकाळी एका रेल्वेला दुर्घटना घडून आग लागली असून या आगीत अनेक प्रवासी अडकल्याचा फोन/संदेश देण्यात आला.सायरान देखील वाजवण्यात आला .अन् सर्वांची एकच धावपळ उडाली . दुर्घटनेची माहिती मिळताच पूर्णा रेल्वे स्थानकाहुन अपघात निवारण गाडी व वैद्यकीय मदत पथक तात्काळ अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरीत प्रवाशांना वाचवण्याचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मात्र ही दुर्घटना नसून दक्षिण मध्य रेल्वेचा नांदेड विभाग आणि एनडीआरएफने संयुक्त मॉक ड्रिलचे आयोजन केल्याचे लक्षात येताच प्रवाशी व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. हे मॉक ड्रिल मंगळवार (दि० २२)रोजी पहाटे करण्यात आले रेल्वेगाडीच्या डब्यांचा अपघात झाला तर काय करता येईल? प्रवाशांना कशाप्रकारे वाचवता येईल? प्राथमिक उपचार तत्काळ कसे पुरवावे? याचे प्रात्यक्षिक रेल्वेकडून करण्यात आले. नांदेड विभागाच्या पूर्णा – अकोला रेल्वेलाईनवर ट्रेनच्या दोन डब्यांच्या अपघाताची माहिती स्टेशन मास्तरकडून मिळाल्यानंतर, रेल्वे नियंत्रण कार्यालयामार्फत सर्व संबंधित विभागांना तातडीने कळविण्यात आले. विलंब न लावता पूर्णा स्थानकावरून अपघात निवारण गाडी व वैद्यकीय मदत गाडी अपघातस्थळाच्या दिशेने रवाना करण्यात आली. यावेळी दक्षिण मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी वेंकट रमणा रेड्डी, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य रोलिंग स्टोक इंजिनियर धर्मेंदर , नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले, नांदेड विभागातील वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि इतर विभागातील सर्व संबंधित शाखा अधिकारी, संबंधित कर्मचारी यांच्यासह वैद्यकीय पथक, रेल्वेचे इतर अधिकारी, रेल्वे संरक्षण दल अपघातस्थळी पोहोचले. मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर पार पडले. अपघाताची माहिती एनडीआरएफ (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स), एमसीओ आणि स्थानिक प्रशासन, पोलिस, राज्य सरकारच्या वैद्यकीय विभागाला देण्यात आली. त्यांनी तातडीने टीमसह अडकलेल्या प्रवाशांच्या मदत आणि बचाव कार्यात सहभाग घेतला. अपघात निवारण कर्मचारी आणि एनडीआरएफने विविध उपकरणांच्या साहाय्याने प्रवाशांना बाहेर काढले.

मॉक ड्रीलच्या वेळी सर्व विभागांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे कौतुक केले. या मॉकड्रीलचे नांदेड रेल्वे विभाग व एनडीआरएफ यांच्याकडून संयुक्तरित्या आयोजन करण्यात आले होते.

______________________________

You cannot copy content of this page