रेल्वेतून मोफत प्रवास करणाऱ्यां ४३८ जणांना पकडले

Spread the love

परभणी,नांदेड,आदिलाबाद विभागातील रेल्वे विभागाची मोहीम;३ लाखांचा दंड वसूल;

पूर्णा.ता.४जुन(प्रतिनिधी)

दमरेच्या १६ रेल्वे गाड्यांतुन अनाधिकृत पणे विनाटिकीट मोफत प्रवास करणाऱ्यां तब्बल ४३८ प्रवाशांना टिकीट तपासणी पथकाने पकडले असून, त्यांच्या कडून सुमारे ३ लाखांचा दंड वसूल केला आहे.हि कारवाई परभणी,नांदेड, आदिलाबाद रेल्वे विभागात ता.२ जुन रोजी करण्यात आली असल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी दिली आहे.

रेल्वेस्थानकात आणि रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश आणि अनधिकृत रेल्वे प्रवासाला आळा घालण्याच्या उद्देशाने रेल्वे विभाग नियमित पणे तिकीट तपासणी मोहीम हाती घेत असते.श्री प्रदीप कामले, माननीय विभागीय रेल्वे व्यवस्थापक/नांदेड प्रदीप कामले, यांच्या सूचनेनुसार आणि डॉ. विजय कृष्णा/वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शना नुसार, ता.२ जून, रोजी परभणी-नांदेड-मुदखेड-आदिलाबाद विभागात एक विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम श्री एन. सुब्बा राव/ सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. यादरम्यान १६ रेल्वे गाड्यांची कसून तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान, अनधिकृत विक्रेते, तिकिटे नसलेले प्रवासी तसेच सीझन तिकीट किंवा जनरल तिकिटांसह आरक्षित डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांक तब्बल ४३८ प्रवाशांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. यात त्यांच्याकडून ३ लाख १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. विभागीय फिरते पथक (डीएफएस-१ आणि डीएफएस-२), नांदेड ज्यात १६ तिकीट तपासनीस

You cannot copy content of this page