शेख सलमान खुन प्रकरणातील दोघे जेरबंद ३ दिवसांची पोलीस कोठडी

Spread the love

पूर्णेत गुरुवारी रात्री कोळीवाडयात घडली होती घटना

पूर्णा ता.१२(प्रतिनिधी)

शहरातील कोळीवाडा येथील शेख सलमान शेख गुलाब यांच्या खून प्रकरणातील दोन जणं अटकेत असून,त्यांना पोलीसांनी मा.पूर्णा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी सोमवार ता.१४ रोजी पर्यंत पोलीस कोठडीत केली आहे.

        पूर्णा शहरातील कोळीवाडा येथील शेख सलमान शेख गुलाब (वय २७) यांचा गुरुवारी या.१० रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास किरकोळ वादातून झालेल्या घटनेत तीघांनी लाथा बुक्याणे मारहाण करुन त्याचे डोके सवारीच्या आलाव्यास जोराने आदळुन त्यास गंभीर जखमी करुन त्याचा खुन केला असल्याप्रकरणी मयताचे भाऊ शे. इम्रान यांचे फिर्यादी वरून पूर्णा पोलीस ठाण्यात गुरनं २९९/२०२५ अन्वये भा.न्या.दं.सं कलम १०३(१) नुसार गुलाब याने कोळीवाडा येथील सुरज जाधव, शंकर पांढरे यांचे सह अन्य एका जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. उपविभागीय पोलीस अधिक्षक डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा घडल्याच्या २४ तासाच्या आत पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी फौजदार प्रकाश इंगोले व आमेर चाऊस, जमादार रमेश मुजमुले,, जमादार बंडु राठोड,पोकाॅ.शैलेश टाकरस,संदिप चौरे ,पोकाॅ.शेंबेवाड,पोकाॅ.शिंदे, आदींना सोबत घेऊन सुरज जाधव,शंकर पांढरे या दोघांना ताब्यात घेऊन जेरबंद केले होते.अटकेत असलेल्या दोघांना पोलिसांनी मा.पूर्णा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सोमवार ता.१४ रोजी पर्यंत दोघांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विलास गोबाडे हे करत आहेत.

You cannot copy content of this page