पूर्णच्या शांताई पेट्रोलियमला एचपीसीएलचा उत्तम सेवा पुरस्कार.!
पूर्णा, ता. २३ (प्रतिनिधी)
येथील सुप्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ तथा शांताई पेट्रोलियमचे डॉ.विनय वाघमारे यांना मुंबई येथे उत्कृष्ट सेवेबद्दल हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड च्या वतीने पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथे हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड च्या सभागृहात मंगळवारी (ता.२२) डॉ.विनय वाघमारे यांना उत्तम सेवा प्रदान केल्याबद्दल ‘एचपीसीएल उत्तम सेवा अवार्ड ‘ प्रदान करण्यात आला. सदरील पुरस्कार एचपीसीएलचे मुख्य कार्यकारी संचालक अनुज जैन व विभागीय व्यवस्थापक अमित कलंगुटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ. विनय वाघमारे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.