शिवरायांना हिंदूसेना ग्रुपच्या वतीने अभिवादन..

Spread the love

पूर्णा (प्रतिनिधी)
शिवजन्मोत्सवा निमित्ताने येथिल हिंदू सेना ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्राचेच नव्हे तर सर्वत्र आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९५ वी जयंती आहे.पूर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवतीर्थावर नतमस्तक होण्यासाठी अनेक शिवभक्तांनी पुष्पहार अर्पण करण्यासाठी दाखल झाले. पूर्णा शहरातच नव्हे तर तालुक्यातील अनेक ठिकाणी देखील शिवजयंती साजरी करण्यात आली.
शिवरायांच्या नावाच्या घोषणा देत हिंदू सेना ग्रुपच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते विक्रम ऊर्फ विक्की कदम, मुंजा भाऊ कदम,अंकित कदम, रमेश ठाकूर,कालीदास वैद्य, विकास वैजवाडे, दौलत भोसले,विठ्ठल कदम, माऊली कदम, भगवान सोळंके आदीं कार्यकर्ते शिवभक्तांनी या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावत अभिवादन केले.

You cannot copy content of this page