गंगाखेड येथे शिवछत्रपतींच्या आश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
गंगाखेड(प्रतिनिधी)
कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून गंगाखेड शहरातील परळी नाका परिसरातील नियोजीत शिवतीर्थाच्या जागेवर शिवप्रेमीं जनतेने उभारलेल्या अश्वारूढ घोड्यावरील शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण १९ फेब्रुवारी रोजी सायं मोठ्या थाटात पार पडले.यावेळी शिवतीर्थावर ढोल ताशांच्या गजरात नेत्रदिपक विद्युत रोषणाई व अतिषबाजी करण्यात आली.
गंगाखेड शहरातील परळी नाका परिसरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजीत जागी महाराजांचा अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम येथिल शिवप्रेमी जनतेने हाती घेतले होते.नुकतेच हे कार्य पुर्णत्वास गेल्यावर पुतळा समीती व नगरपालिका प्रशासनाने शिवजयंतीचा मुहूर्त साधून बुधवारी ता. १९ फेब्रुवारी रोजी सायं अनावरण कार्यक्रमाचेंचे आयोजन केले होते.दरम्यान विधीवत पूजन करण्यात आले.यावेळी शहरात सर्वत्र भगवे झेंडे,पताका,ढोल ताशा पथक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.शिवछत्रपतींच्या घोषणेने शिवप्रेमी जनतेने परिसर दणाणून सोडला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीआ. डॉ. रत्नाकर गुट्टे सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून खा. संजय जाधव,मा.आ. डॉ.मधुसूदन केंद्रे,मा.नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे,मा. नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, शिवसेना नेते विशाल कदम, प्राचार्य आत्माराम टेंगसे, किशनराव भोसले, स. पो.नि. ऋषिकेश शिंदे, श्रीकांत भोसले, अनिल सातपुते,बाळाकाका चौधरी, मनोज काकाणी, आदी मान्यवरांसह शहर व परिसरातील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी ,सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी,हजारोंच्या संख्येने शिव प्रेमींजनतेची उपस्थिती होती.