रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हा-साहेबराव कल्याणकर
पूर्णा(प्रतिनिधी)
दुर्गराज रायगडवर ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा ‘लोकोत्सव’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून स्वयंशिस्त पाळत शिवप्रेमींनी जल्लोषात सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य साहेबराव कल्याणकर यांनी केले.
पुर्णेत शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पुर्वतयारी संदर्भात शिवप्रेमी जनतेतेची बैठक आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते.अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड मार्फत युवराज छत्रपती संभाजी महाराज व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली 352 वा शिवराज्या भिषेक सोहळा दिन किल्ले रायगडवर ०६ जून रोजी साजरा करण्यात येत आहे. हा शिवराज्याभिषेक संपूर्ण भारताच्या संस्कृती दर्शनाचा, पराक्रमी इतिहासाच्या उजळणीचा एक भव्य सोहळा व्हावा. यासाठी किल्ले रायगड वर विविध उपक्रमांचे आयोजन दिनांक 5 व 6 जून रोजी केले आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून प्रेरणादायी असे शिवचरित्र जगभरातील लोकांपुढे जावे हा यामागील उद्देश आहे. लाखो शिवभक्तांच्या सक्रिय सहभागामुळे हा सोहळा लोकोत्सव झाला असून यंदा गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता लक्षात घेता शिवभक्तांनी स्वयंशिस्त पाळून गडावर यावे. देऊन पूर्णा तालुका व परभणी जिल्ह्यातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस माधव आवरगंड, दत्ता कदम, गणेश बुचाले, गणेशराव शींदे,शरद कदम,सुरेश शींदे, कपील किरडे, भास्करराव तांबे,गोवींद महामुनी आदींची उपस्थिती होती.
——————————————–
गडावर होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती
ता. ५ जून २०२५ गुरुवार दु.३;३० वाजता राजमाता जिजाऊ साहेब यांच्या समाधीस अभिवादन करून शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ.पायी गड चढण्यास प्रारंभ,स्थळ नाणे दरवाजा. गड पूजन, धार तलवारीची युद्ध कला महाराष्ट्राची युद्ध कलेच्या प्रात्यक्षिकास प्रारंभ, स्थळ होळीचा माळ. ढोल वादन, लेझीम प्रात्यक्षिके व वारकरी सांप्रदाया कडून टाळ मृदुंगाचा गजर, जागर शिवशाहीरांचा, स्वराज्याच्या इतिहासाचा, स्थळ राजसदर.रात्रौ ९ वाजता गड देवता शिरकाई देवीचा गोंधळ, स्थळ शिरकाई मंदिर. जगदीश्वर मंदिरात भजन कीर्तन.
– शुक्रवार, दिनांक ६ जून २०२५ स.७ युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण, स्थळ नगारखाना. शाहिरी कार्यक्रम, स्थळ राजसदर, श्री शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन.सकाळी १० वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या हस्ते श्री शिवछत्रपती महाराजांच्या उत्सवमूर्तीस व.सिंहासनारूढ मूर्तीस सुवर्ण मुद्रांचा अभिषेक.स.११ वा. पालखी सोळहा शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस अभिवादन..