रेल्वे ब्रिजखालील पूर्णा–हयातनगर मार्गावरील विस्तृत रस्ता व नाली करावी
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
पूर्णा, ता.३ (प्रतिनिधी)शहरातुन हिंगोली व नांदेड कडे जाणाऱ्या लोहमार्गावर नव्याने उभारण्यात येत असलेल्या रेल्वे ब्रिजच्या कामामुळे परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावरील आडगाव (ला.), सुहागण, बरबडी, आवई, हयातनगर ही प्रमुख गावे या ब्रीज खालील रस्त्याने जोडलेली आहेत. दळणवळणासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून सध्या ब्रिजचे काम सुरू असल्याने रस्ता विस्तुतीकरण तसेच पाणी वाहून नेणारा नाला नसल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत.ब्रिज पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण होण्यापूर्वी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गट व ग्रामस्थांनी केली आहे.या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार माधवराव बोथिकर यांची (ता.३) रोजी भेट घेऊन निवेदन सादर केले.
पुर्णा ते हयातनगर रस्ता रेल्वे उड्डाणपूलाच्या कामामुळे अरुंद झाला असल्याने वाहने एकमेकांना धडकण्याची शक्यता कायम राहते. शिवाय पक्का रस्ता बांधण्यात आला नसल्याने पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पानणी साचून दोन रहदारीस अडथळा निर्माण होतो आहे.त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पाणी निचऱ्यासाठी नालीची सोय करून दिल्यास जनतेचा जीवितधोकाही टळेल, असा मुद्दा निवेदनात नमूद करण्यात आला आहे.या निवेदनात प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पुलाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्याचे रुंदीकरण व नाली बांधकाम करून द्यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम,आनंद बुचाले,किसन सोलव, कैलास पडोळे, ज्ञानेश्वर भोसले, संदिप भोसले, माउली बुचाले, सुरेश भोसले, रामचंद्र भोसले, अविनाश सोलव, निवृत्ती सोलव,बालाजी सोलव, गणेश शिंदे,बालाजी सुर्यवंशी, गोविंद सोलव, गणेश सोलव,हरी सोलव, नागनाथ शिंदे, शेख मेहमूद आदीं शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.












