पंचायत समिती कार्यालय परिसराला लागली आग;मोठा अनर्थ टळला

Spread the love

पूर्णा पंचायत समिती कार्यालयातील प्रकार; विद्युत वाहिन्यांचे शार्टसर्किट ठरलं कारणीभूत

पूर्णा(प्रतिनिधी)

शहरापासून जवळच असलेल्या पंचायत समितीच्या आवाराला परिसरातून गेलेल्या ३३ के.व्ही.विद्युत वाहीन्यात घर्षण होऊन गुरुवारी ता.१० रोजी सायं ६ वाजण्याच्या सुमारास आग लागली.या आगीने पंचायत समितीच्या कार्यालयाला वेढले परंतु अग्नीशामक दलाच्या जवानांनी तातडीने उपाययोजना करुन वेळीच आग आटोक्यात आणली.सुदैवाने यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.मोठा अनर्थ टळला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,पूर्णा शहराजवळून ताडकळस कडे जाणाऱ्या रस्त्यावर शासकीय कार्यालये आहेत.यामध्ये सा.बां विभागाला लागुन पंचायत समितीचे कार्यालय तसेच कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत.गुरुवारी १० रोजी सायं ६ वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा सुटला यावेळी पंचायत समिती कार्यालय परिसरातुन गेलेल्या विद्युत वाहिन्यांत घर्षण होऊन शार्टसर्किटमधुन निघालेल्या विस्तवाने परिसरात वाढलेले तण झाडे झुडपे यांनी पेट घेतला. पहाता पहाता पंचायत समितीच्या कार्यालयाला चारही बाजूंनी आगीने वेढले.घटनेची माहीती गटविकास अधिकारी मयुर आंदेलवाड यांनी पूर्णा पालीकेच्या अग्निशमन दलाला दिली.तातडीने अग्नीशामक दलाचे गणेश रापतवार, अमजद कुरेशी,सोनाजी खिल्लारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याची कारवाई सुरू केली.अर्धाधिक तासांच्या आत जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली .यावेळी परिसरातील वाढलेले तण तसेच झाडें झुडपे जळाली असुन, सुदैवाने कार्यालयाला कींवा कार्यालयातील साही त्यास कोणतीही हानी पोहोचली नाही.

You cannot copy content of this page