श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात रोजगार मेळावा

Spread the love

पूर्णा ता.१९(प्रतिनिधी)

(Shri Gurubuddhiswami Mahavidyalaya Purna);येथिल श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात ता.१९ रोजी बॅकींग सह विविध क्षेत्रातील नौक-यासाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी जवळपास १०० हुन अधिक आजी माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला होता.

पूर्णा येथिल श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात करिअर गाईडन्सप्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने Career Guidance and Placement Cell” आणि ” Global Out Sourcing and Training Services” यांच्या संयुक्त विद्यमाने आय. सी. आय. सी. आय,बँक ऑफिसर या पदासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, हिंगोली परिसरातील बी.ए.; बी.कॉम., बी.एस्सी., बी. ई . पदवीधर तसेच पदव्युत्तर असलेले सुमारे १०० हुन अधिक पेक्षा जास्त आजी माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव प्रा.गोविंदराव कदम तर मंचावर ग्लोबल आऊटसोर्सिंग व ट्रेनिंग सर्विसेसचे गणेश शहिणे प्राचार्य डॉ के.राजकुमार उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी प्रास्ताविकात म्हटले की, रोजगाराच्या संधी महाविद्यालयात उपलब्ध केल्याने वि‌द्यार्थ्यांना त्याचा अधिकाधिक फायदा होईल व पुढील काळात ते यशस्वी होण्यासाठी मदत होईल.या मेळाव्या साठी श्री हे उपस्थित होते. डॉ. जितेंद्र पुल्ले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर डॉ. सोमनाथ गुंजकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. गजानन कुरुंदकर , डॉ. शिवसांब कापसे,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. संजय दळवी,कार्यालयीन अधीक्षक श्री बाळासाहेब कुलकर्णी, डॉ. प्रकाश भांगे, डॉ. गंगाधर कापुरे, डॉ. रविद्र राख, डॉ.अजय कुऱ्हे बाळासाहेब मुसळे, श्री मंचक वळसे श्री गजानन भालेराव महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

You cannot copy content of this page