क्रिडा स्पर्धेत श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयाचे यश

Spread the love

पूर्णा ता.१३(प्रतिनिधी)येथिल श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व के.के.एम. महाविद्यालय, मानवत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतर-महाविद्यालयीय डी-झोन मैदानी स्पर्धेत विविध क्रिडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.

क्रिडा शिक्षक प्रा. सतीश बरकुंटे यांचे मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत महाविद्यालयातील खेळाडू किरण ज्ञानोबा ढोणे हिने १०० मीटर, २०० मीटर धावणेलाँग जंप या तिन्ही प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून त्रिकुट विजेतेपद पटकावले. तसेच ४×१०० मीटर रिलेमध्ये तिच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. अंजली ज्ञानेश्वर कुऱ्हे हिने लाँग जंपमध्ये तृतीय क्रमांक, तसेच ४×१०० मीटर रिलेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. शितल शंकर साखरे हिने ४०० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक, तर शितल महादेव कुऱ्हेवैष्णवी लक्ष्मण खैरे यांनी ४×१०० मीटर रिलेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.

या सर्व विजयी खेळाडूंची निवड अंतर-महाविद्यालयीय मैदानी स्पर्धेसाठी झाली आहे.तसेच महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत कुमारी सुरेखा बंडू पवार हिने भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक, तर श्रावणी संतोष शिंदे हिने ३००० मीटर वॉकिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. या दोन्ही विद्यार्थिनींची निवड छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.

विजयी खेळाडूंचे संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद अण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम, सहसचिव गोविंदराव कदम, प्राचार्य डॉ. के. राजकुमार, उपप्राचार्य डॉ. शिवसांब कापसे, डॉ. गजानन कुरुंदकर व पर्यवेक्षक उमाकांत मिटकरी यांनी विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.या विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा. सतीश बरकुंटे यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि स्थानिक पातळीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

You cannot copy content of this page